शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स वर्कर बनली, ड्रग्सही विकले; दररोज 1 लाख रूपयांच्या नशेच्या सवयीने केलं तिला उद्ध्वस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 10:31 IST

ड्रग्स सप्लाय केसमध्ये पकडली गेल्यावर सुनावणी दरम्यान मॉस हे सांगताना रडली आणि म्हणाली की, तिला एका दिवशी 1.23 लाख रूपयाचं कोकिन लागत होतं.

नशेची सवय माणसाला उद्ध्वस्त करते. एका महिलेसोबत तेच झालं. ती एक लक्झरी लाइफ जगत होती, पण ड्रग्सच्या सवयीने तिला उद्ध्वस्त केलं. आता ती तुरूंगात आहे. ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमधील ही घटना आहे. 27 वर्षीय या महिलेचं नाव एलॅग्जेंड्रा मॉस आहे. 

ड्रग्स सप्लाय केसमध्ये पकडली गेल्यावर सुनावणी दरम्यान मॉस हे सांगताना रडली आणि म्हणाली की, तिला एका दिवशी 1.23 लाख रूपयाचं कोकेन लागत होतं. इतकी महागडी गरज पूर्ण करण्यासाठी तिने ड्रग्स विकण्यापासून ते सेक्स वर्करपर्यंतचं काम केलं.

मॉस सिडनीच्या रोज बे मध्ये तिच्या भाड्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात ड्रग्स डीलिंग करत होती. पोलिसांनी तिचा फोन टॅप केल्यानंतर तिला अटक केली होती. तिच्या घरात कोकिन आणि गांजा आढळून आला. अटक केल्यावर मॉसने मान्य केलं की, तिने तिची गरज भागवण्यासाठी डिसेंबर 2020 ते एप्रिल 2021 दरम्यान ड्रग्सचा व्यवसाय केला.

चौकशीतून समोर आलं की, नशेचा खर्च भागवण्यासाठी ती सेक्स वर्कर म्हणूनही काम करत होती. जेव्हा तिला अटक केली गेली तेव्हा तिच्याकडे 9.6 किलो ड्रग्स सापडले.

पोलिसांना मॉसच्या फोनमध्ये अनेक फोटोही सापडले ज्यात ती ड्रग्सची पॅकेट हातात घेऊन हसताना दिसत आहे. ती कोर्टात म्हणाली की, 'ती तिच्या अटकेसाठी स्वत:ला जबाबदार मानते'.  पोलिसांनी तिच्या घरात मोठी रक्कमही सापडली. याबाबत ती म्हणाली की, तिने हे ड्रग्स डीलिंग करून नाही तर सेक्स वर्क करून कमावले आहेत. मेडिकल टेस्टमधून समोर आलं की, ती डिप्रेशनने ग्रस्त आहे. तसेच ती ड्रग्सचं व्यसन सोडवण्यासाठी औषधेही घेत होती.

कोर्टाने मॉसला 23 महिन्याच्या नॉन पेरोलसोबत चार वर्ष चार महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. सुनावणी दरम्यान मॉस सतत रडत होती. 

टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाCrime Newsगुन्हेगारी