शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक!...म्हणून फौजदाराच्या पत्नीची स्वत:हून गोळी झाडून आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 19:21 IST

गडचिरोली जिल्ह्यातील घटना, नातेवाईक म्हणतात, पतीने गोळी झाडली

ठळक मुद्देमहिला कॉन्स्टेबलशी असलेल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरल्यानेच पती फौजदार धनराज याने स्वत:जवळील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याचा आरोप संगीताचा भाऊ गणेश सपके याने केला आहे.याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव : वराड, ता.धरणगाव येथील मूळ रहिवाशी असलेले फौजदार धनराज बाबुलाल शिरसाठ यांची पत्नी संगीता (२८) यांनी स्वत:च्या हाताने पतीच्या रिव्हॉल्वरमधून गोळी झाडल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजता पोमके, ता.मुलचेरा जि.गडचिरोली येथे घडली. जखमी अवस्थेत संगीता यांना चंद्रपूर येथे सरकारी रुग्णालयात दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान, संगीता हिच्या माहेरच्या लोकांनी मात्र, पती धनराज यांनीच तिच्यावर गोळी झाडली असून तशी माहिती घटनास्थळावर असलेल्या तिच्या मुलीनेच कळविल्याचे म्हणणे आहे. महिला कॉन्स्टेबलशी असलेल्या अनैतिक संबंधात अडथळा ठरल्यानेच पती फौजदार धनराज याने स्वत:जवळील सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळीबार केल्याचा आरोप संगीताचा भाऊ गणेश सपके याने केला आहे.गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रानुसार, धनराज शिरसाठ हे अहेरी उपविभागात येणाऱ्या मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पत्नी संगीता, मुलगी भार्गवी (९), मुलगा शुभम (४) व आई, वडील यांच्यासह मुलचेरा येथे शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते. धनराज हे गुरुवारी नक्षलविरोधी अभियान राबवून दुपारी पोमके, मुलचेरा येथे परतले. त्यानंतर आई, वडीलांसह मुलचेरा येथे गेले होते.पत्नी संगीता व दोन मुले असे घरी होते. दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान संगीता यांनी राहत्या घरात स्वत:वर डोक्यात रिव्हॉल्वरने गोळी मारली. फायरींगचा आवाज ऐकून व आईने स्वत:वर गोळी झाडल्याचे पाहून भार्गवीने आरडाओरड केली पामके येथे तैनात असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथून त्यांना चंद्रपुर येथे हलविले, मात्र सरकारी रुग्णालयात संगीता यांना मृत घोषीत करण्यात आले.

भाचीनेच घटना पाहिल्याचा दावामृत संगीता हिचा भाऊ गणेश सपके याने ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी दीड वाजता भाची भार्गवी हिने मोबाईलवर संपर्क करुन माहिती दिली की, पप्पांनी मम्मीला पिस्तुलची गोळी मारली. एक गोळी डोक्यात तर दुसरी कानाजवळ लागली. ती बेशुध्द आहे. ही माहिती देताना भार्गवी प्रचंड आक्रोश करीत होती, तिचा थरकाप उडत होता. यानंतर संगीताचे सासू-सासरे यांच्याशी संपर्क केला असता तिला चंद्रपूर येथे सरकारी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने बहिणाचा मृत्यू झाल्याचा निरोप रुग्णालयातून मिळाल्याचे सपके याने सांगितले.शिपायाचा झाला फौजदारदरम्यान, या घटनेतील मृत संगीता (२८) यांचे माहेर शहरातील सम्राट कॉलनीनजीकच्या लक्ष्मी नगरातील तर उपनिरीक्षक धनराज हे वराड, ता.धरणगाव येथील मुळ रहिवाशी आहेत. धनराज मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते, त्यानंतर जिल्ह्यात बदलून आले होते. शहर पोलीस ठाण्यात चार वर्ष नोकरी केली. २०१७ मध्ये खात्यांतर्गत उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची गडचिरोली येथे बदली झाली होती. तेथे मुलचेरा या तालुक्याच्या ठिकाणी त्याची नियुक्ती आहे. सरकारी निवासस्थानात पत्नी संगीता, मुलगी भार्गवी (७) व मुलगा शुभम (४) यांच्यासह वास्तव्याला होते. संगीता हिचा सात वषार्पूर्वी धनराज शिरसाठ याच्याशी विवाह झाला होता. जळगाव शहरात मोठा स्वागत समारंभ झाला होता. दुसरीसाठी हवा होता घटस्फोटसंगीता यांचा भाऊ गणेश सपके यांनी दिलेल्या माहितीनुसार, धनराज यांचे गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असलेल्या एका विवाहित महिला कॉन्स्टेलबशी अनैतिक संबंध आहेत. दोघंही विवाहित असताना त्यांना नवीन संसार थाटायचा होता, त्यासाठी धनराज यांना पत्नीकडून घटस्फोट हवा होता. त्यासाठी ते वर्षभरापासून संगीता हिला त्रास देत होते. घटस्फोटासाठी त्रास असह्य होत असल्याने वराड येथे त्याच्या आई, वडीलांच्या कानावर हा प्रकार घालण्यात आला. लॉकडाऊन लागू होण्याच्या काही दिवस आधीच धनराजचे वडील बाबुलाल नामदेव शिरसाठ व आई सुशिलाबाई गडचिरोली येथे त्यांची समजूत घालण्यासाठी गेले होते. आता ते तेथेच असताना ही घटना घडली. दरम्यान,या घटनेची माहिती मिळाल्यावर जळगावातील माहेरची मंडळी तातडीने गडचिरोलीकडे रवाना झाले. खेडी पेट्रोल पंपावर वाहनात डिझेल टाकत असतानाच संगीताचा श्वास थांबल्याचा निरोप धडकला. 

Coronavirus : जेवण वाटपाच्या श्रेयावरून आजी - माजी तीन नगरसेवकांमध्ये राडा

 

तुझ्यासाठी कायपण! परदेशी गर्लफ्रेंडशी लग्न करण्यासाठी प्रियकराने लपूनछपून गाठले शिमला अन्... 

टॅग्स :Suicideआत्महत्याFiringगोळीबारJalgaonजळगावPoliceपोलिस