...म्हणून नवाज शरीफ यांना परदेशात उपचारासाठी नाही जाता आले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 17:40 IST2019-11-10T17:39:23+5:302019-11-10T17:40:25+5:30

आज सकाळी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनला जाणार होते.

... So Nawaz Sharif did not go abroad for medical treatment | ...म्हणून नवाज शरीफ यांना परदेशात उपचारासाठी नाही जाता आले

...म्हणून नवाज शरीफ यांना परदेशात उपचारासाठी नाही जाता आले

ठळक मुद्देनवाज शरीफ यांनी शुक्रवारी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आणि कुटुंबियांच्या आग्रहास्तव   उपचारासाठी ब्रिटनला जाण्यास तयार झाले होते.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या लिस्टमधून त्यांचे नाव हटविले जाईल असं आश्वासन दिले आहे.  

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी पंतप्रधाननवाज शरीफ यांना उपचारासाठी लंडनला जाण्याची शक्यता कमी वाटत आहे. कारण सरकारने फ्लाय लिस्टमधून नवाज शरीफ यांचं नाव हटविले आहे. ज्या व्यक्तीचे नाव फ्लाय लिस्टमधून हटविले जाते ती व्यक्ती देशात अथवा देशाबाहेर विमानाने प्रवास करू शकत नाही. ६९ वर्षाचे पाकिस्तान मुस्लिम लीग नवाजचे (पीएमएल - एन) अध्यक्ष नवाज शरीफ यांनी शुक्रवारी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आणि कुटुंबियांच्या आग्रहास्तव   उपचारासाठी ब्रिटनला जाण्यास तयार झाले होते. त्यानंतर आज सकाळी पाकिस्तान आंतरराष्ट्रीय विमानतळाहून लंडनला जाणार होते.

एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार नवाज शरीफ यांचे नावफ्लाय लिस्टमधून काढून टाकू शकत नाहीत. कारण, एनबीएचे अध्यक्ष एनओसी देण्यासाठी नाहीत. ते पुढे म्हणाले की, एनबीएच्या अधिकाऱ्यांनी शरीफ यांचे वैद्यकीय अहवाल मागविले आहेत. मात्र,  हे विशेष प्रकरण असून म्हणूनच सरकार नवाज यांचं नाव नो फ्लाय लिस्टमधून हटवू शकते. शरीफ यांच्या या प्रकरणी सोमवारी म्हणजेच उद्या विचार केला जाईल. याआधी शरीफ यांना रविवारी सकाळी भाऊ शाहबाज शरीफसोबत जाणार असल्याचे पीएमएल - एनच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले होते. पुढे ते म्हणाले, "शरीफ यांचे नक्की नो फ्लाय लिस्टमध्ये नाव आहे. मात्र, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या लिस्टमधून त्यांचे नाव हटविले जाईल असं आश्वासन दिले आहे.  

भ्रष्टाचार प्रतिबंधक राष्ट्रीय उत्तरदायित्व न्यायालयाने (नॅब) शरीफ गजाआड केले. चौधरी साखर कारखान्यात नवाज यांची मुलगी मरियम नवाज या महत्त्वाच्या भागधारक आहेत. कोट्यवधी रुपयांची त्यांनी यात गुंतवणूक केली आहे. त्यांच्याद्वारे मोठ्या रकमेचे बरेच व्यवहार झाले आहेत. नवाझ शरीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून याप्रकरणी ते लाहोरमधील कोटलखपत तुरूंगात शिक्षा भोगत होते. गेल्या सोमवारी नवाझ शरीफ तरूंगात असताना प्रकृतीत बिघाड झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरातील रक्तपेशी कमी झाल्याने नवाझ शरीफ यांची प्रकृती गंभीर झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु होते. प्रकृतीच्या कारणास्तव नवाज यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 

Web Title: ... So Nawaz Sharif did not go abroad for medical treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.