शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पतीने पत्नीचा आवळला गळा अन् मृतदेह टाकून दिला नाल्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 18:45 IST

आरोपीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे.

ठळक मुद्देयाप्रकरणी पोलिसांनी जिपेंद्रसिंग उर्फ भूपेंद्र याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह १० दिवसांपूर्वी नाल्यात सापडला होता.अखेर ३० जानेवारीला तो पत्नी आणि मुलीला अलीगढ येथे घेऊन गेला आणि रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केली.

आग्रा - उत्तरप्रदेशातील फिरोजाबाद येथे एका नाल्यात १० दिवसांपूर्वी एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला आणि परिसरात खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी जिपेंद्रसिंग उर्फ भूपेंद्र याला मंगळवारी अटक करण्यात आली आहे. आरोपीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याचे पोलिसांकडे कबूल केले आहे.उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे पोलिसांनी एका व्यक्तीला आपल्या पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली मंगळवारी अटक करण्यात आली आहे. एका २४ वर्षीय महिलेचा मृतदेह १० दिवसांपूर्वी नाल्यात सापडला होता. या प्रकरणी तपास करताना पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. मृत महिलेचे नाव लाखी जाटव असं आहे. तिचा नवरा जिपेंद्रसिंग उर्फ भूपेंद्र याने पत्नी त्याच्या पगारातील पैसे हे आपल्या नातेवाईकांवर खर्च करत असल्याचा रागातून पत्नीची गळा आवळून हत्या केली. 

२०१५ साली जिपेंद्रसिंह आणि लाखी यांनी आंतरजातीय विवाह केला. कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेविरूद्ध लग्न केले असल्याने मुलाचे आई - वडिल मुलासोबत राहत नव्हते. लग्नाच्या एका वर्षानंतर त्यांना एक मुलगीही झाली. पत्नीने पतीला तिच्या आई - वडील राहत असलेल्या अलिगढ येथे राहण्यास जाण्यासाठी आग्रह केला. या आग्रहास्तव लग्नानंतर दोघेही अलीगढच्या गोकुलेशपुरम कॉलनीत राहण्यासाठी गेले होते. येथे ते भाड्याच्या घरात राहत होते. भूपेंद्र हा एका खासगी कंपनीत कामाला होता. दरम्यान, त्याची पत्नी ही त्याची असणारी प्रॉपर्टी विकून अलीगढच्या मुख्य शहरात घर घेण्यासाठी त्याच्यावर सतत सांगत असे. 

भूपेंद्रला काही दिवसांनी लाखी ही त्याच्या पगारातील मोठी रक्कम तिच्या नातेवाईकांवर खर्च करते असं कळालं. या गोष्टीचा त्याला खूप राग आला. यावरुन दोघांमध्ये भांडणाचे खटके उडू लागले. अखेर ३० जानेवारीला तो पत्नी आणि मुलीला अलीगढ येथे घेऊन गेला आणि रात्री १ वाजण्याच्या सुमारास त्याने पत्नीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने तिचा मृतदेह नाल्यात फेकला. १० दिवसांनी महिलेचा मृतदेह नाल्यात सापडल्यानंतर पोलिसांनी पतीला अटक केली. भूपेंद्रच्या इतर नातेवाईकांचाही सहभाग असण्याला संशय पोलिसांना आहे. पोलिसांनी लाखीच्या वडिलांच्या तक्रारीवरून हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू केला आहे.

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसArrestअटक