शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून त्यांनी तरुणीला भिंतीत जिवंत गाडले, धक्कादायक प्रकार आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 15:08 IST

Crime News: मध्ययुगामध्ये अपराध्यांना किंवा विरोधकांना भिंतीत चिणून मारण्यात आल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र आज २१ व्या शतकात असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

रांची - मध्ययुगामध्ये अपराध्यांना किंवा विरोधकांना भिंतीत चिणून मारण्यात आल्याच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. मात्र आज २१ व्या शतकात असाच एक धक्कादायक प्रकार झारखंडमध्ये घडला आहे. येथे जमिनीच्या वादातून एका १९ वर्षीय तरुणीला काही जणांनी भिंतीत जिवंत गाडले. मात्र सुदैवाने पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने तरुणीचे प्राण वाचले. ही घटना कोडरमा येथील जयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या योगिया टिलहा गावात घडली. जमिनीवर कब्जा करण्याच्या इराद्याने येथील काही गुंडांनी विरोधी गटातील तरुणीला घरातील एका खोलीत कोंडून बाहेरून कुलूप लावले. त्यानंतर बाहेरून भिंत बांधून या तरुणीला आत बंदिस्त करून टाकले. ही तरुणी आतमध्ये सुमारे सहा तास अडकून पडली. अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत भिंत तोडून या तरुणीला बाहेर काढले.   या तरुणीचे वडील किशोर पंडित यांचा गावातील विनोद पंडित यांच्यासोबत जमिनीवरून बऱ्याच काळापासून वाद सुरू आहे. ही तरुणी घरात एकटी असताना विनोद पंडित आणि त्याच्यासोबत ५-६ जण आले. त्यांनी या तरुणीला जबरदस्तीने खोलीत बंद केले. त्यानंतर बाहेरून भिंत बांधून तिला आतमध्ये कोंडून टाकले. या घटनेची माहिती परिसरातील कुणीतरी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत पीडितेची सुटका केली. तसेच या तरुणीची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली.  

पीडित तरुणीने सांगितले की, तिला खोलीत बंद करून भिंत उभारण्यात येत असताना तिने आरडाओरडा केला. मात्र तिच्या मदतीसाठी कुणीही धावून आले नाहीत. दरम्यान तरुणीच्या आईवडलांना याबाबत समजल्यावर त्यांनीही तातडीने गावाकडे धाव घेतली. 

रात्री उशिरा आपल्या मुलीला घेऊन रुग्णालयात पोहोचलेल्या किशोर पंडित यांनी सांगितले की, त्यांचा गावातीलच काही लोकांसोबत जमिनीवरून वाद सुरू आहे. जमिनीवर कब्जा करण्याच्या वाईट हेतूने त्यांनी मुलीला घरात बंद करून बाहेरून भिंत बांधली. या प्रकरणी जयनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका महिलेला अटक करण्यात आली असून, पाच आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJharkhandझारखंड