शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मध्य व उत्तर प्रदेशातून गावठी पिस्तुलची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 18:10 IST

गावठी पिस्तुलचे मायाजल :  दीड वर्षात ३९ पिस्तुलं आणि ४८ काडतूसे जप्त,  सहा वर्षात १०३ पिस्तुलं व १६९ काडतूसे पकडले,  १६८ आरोपींना केली अटक

ठळक मुद्दे२०१५ व २०१६ या दोन वर्षात सर्वाधिक ४० पिस्तुल पोलिसांनी पकडले होतेपोलिसांनी पकडलेल्या या गावठी पिस्तुलचा वापर रस्ता लुट, खून, दरोडा या सारख्या गुन्ह्यात झालेला आहे.

सुनील पाटीलजळगाव -  मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश या दोन राज्यातून गावठी पिस्तुलची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. पोलिसांनी दीड वर्षात ३९ पिस्तुल व ४८ जीवंत काडतून जप्त केले असून ५५ आरोपींना अटक केली आहे. त्याशिवाय ३८ गुन्हे दाखल झाले आहेत. याआधीच्या पाच वर्षात  ६४ पिस्तुल व १२१ राऊंड पकडण्यात आले होते. चालू दीड वर्षाची आकडेवारी आणि पाच वर्षाची आकडेवारी यावर नजर टाकली असता अलीकडच्या काळात पिस्तुलची तस्करी वाढल्याचे सिध्द होत आहे.दरम्यान, यात सर्वाधिक पिस्तुल हे स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहेत.पोलिसांच्या रेकॉर्डवरील ही आकडेवारी असली प्रत्यक्षात पिस्तुलचा हा आकडा यापेक्षाही जास्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी पकडलेले हे सर्व पिस्तुल दरोडा, घरफोडी व रस्ता लुट प्रकरणातील रेकॉर्डवर असलेल्या आरोपींकडेच आढळून आले आहेत. घटना घडल्यानंतर किंवा घटनेच्या आधीही हे पिस्तुल पकडण्यात आलेले आहेत.२०१५ व २०१६ या दोन वर्षात सर्वाधिक ४० पिस्तुल पोलिसांनी पकडले होते, आता दीड वर्षाची आकडेवारीही तितकीच आहे. हे सर्व पिस्तुल मध्यप्रदेशातील उमर्टी या खेडेगावातून आलेले असल्याचे निष्पन्न झाले आहे. उत्तर प्रदेशात अशा पिस्तुलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने हे पिस्तुल तेथूनच रेल्वे मार्गाने भुसावळात आल्याचा दाट संशय पोलिसांना  आहे.

गुन्हेगारीसाठी होतोय वापरपोलिसांनी पकडलेल्या या गावठी पिस्तुलचा वापर रस्ता लुट, खून, दरोडा या सारख्या गुन्ह्यात झालेला आहे. काही वर्षापूर्वी एक पिस्तुल तर पोलिसानेच उमर्टी येथून आणल्याचे निष्पन्न झाले होते. या पोलिसाला तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले होते. आताही एक गावठी पिस्तुल पोलिसाकडेच असल्याची चर्चा आहे. चोपडा मार्गेच गावठी पिस्तुलची तस्करी होत असून घेणाऱ्याला अटक केली जाते, मात्र विक्री करणाऱ्याला अटक होत नाही.मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील पिस्तुलचे गौडबंगाल?महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऑगस्ट महिन्यात जळगाव दौऱ्यावर होते. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची मेटेल डिटेक्टरद्वारे तपासणी करताना पोलिसांच्या एका वाहनात गावठी पिस्तुल आढळून आले होते, मुंबईच्या अधिकाऱ्यांनी या वाहनचालकाला चांगलेच फैलावर घेत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचा दम भरला होता, कर्मचाऱ्यांनी गयावया केल्याने ताफ्याचे इंचार्ज असलेल्या एका उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येवू शकते, म्हणून हे प्रकरण जागेवरच दाबले.  गावठी पिस्तुल पोलिसाकडे आलेच कसे? व हे पिस्तुल सध्या कोणाकडे आहे? याची चौकशी करण्याचीही तसदी अधिकाऱ्यांनी घेतली नाही. पंतप्रधानांच्या दौऱ्याचे विमानतळावर चोरुन व्हिडीओचित्रण झाले होते.तेव्हा पोलिसांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात येवून तत्कालिन पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांची बदली झाली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात गावठी पिस्तुल आढळून आल्यानंतरही त्याची साधी चौकशीही झाली नाही. यात काही घातपात झाला असता तर त्याला जबाबदार कोण? हे पिस्तुल का जप्त केले जात नाही, संबंधिताला का पाठीशी घातले जात  आहे. याआधी सरकारी पिस्तुल चोरी झाले तेव्हा दोन कर्मचारी निलंबित झाले होते. आता तर गावठी व अवैध पिस्तुलच आढळून आले तेही मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात.दहा हजारापासून पिस्तुल उपलब्ध... उमर्टी येथे तयार झालेले पिस्तुल हे दहा हजारापासून ते २० हजारापर्यंत मिळतात. उत्तर प्रदेशातील पिस्तुलचे दर हे अधिक आहेत.गुन्हेगारांमार्फतच हे पिस्तुल मिळतात. चोपडा भागातील सातपुडा जंगलाला लागून असलेले उमर्टी हे गाव मध्य प्रदेशात येते. या गावात तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याचेही प्रसंग आहेत. त्यामुळे येथे जातांना जळगाव पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांची मदत घेतली आहे.

असे आहेत वर्षनिहाय पकडलेले पिस्तुलवर्ष     पिस्तुल  राऊंड  गुन्हे  आरोपी२०१३     ०८      ११      ०९         २२२०१४   ०४    ०२          ०४        ०५२०१५   २०    ६६           १६        ३१२०१६   २०     २८          १४       ३३२०१७  १२     १४           १४        २२२०१८   १५   १९            १५        २१२०१९  २४     २९           २३       ३४एकूण १०३  १६९        ९५        १६८ 

टॅग्स :ArrestअटकJalgaonजळगावPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी