शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

खळबळजनक! फ्लॅटमधून आला दुर्गंध, दरवाजा उघडून पाहतात तर बहिणींचे कुजलेले मृतदेह 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 16:50 IST

ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील आहे.

ठळक मुद्देपोस्टमार्टमनंतर संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. घटनास्थळावरून सुसाइड नोटही सापडली नाही.दोघांच्याही गळ्याला दोरीचे फास होते आणि मृतदेह कुजलेले होते.

नवी दिल्ली - घरा मालकाने शेजारचे आपले घर भाड्याने राहण्यासाठी दोन बहिणींना दिले होते. भाडे घेण्यासाठी पाठविले तेव्हा तेथील रहिवाशांनी त्याला सांगितले की आतून दुर्गंध येत आहे. नंतर पोलिसांना बोलविण्यात आले. फ्लॅटच्या आतलं दृश्य भयानक होतं. बंद फ्लॅटमध्ये दोन मुलींचे दोन कुजलेले मृतदेह पडले होते. ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूर शहरातील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बारा येथील रहिवासी राजेश पांडे हे दिल्ली बीएसएफमध्ये तैनात आहेत. कानपूरच्या पनकी पोलिस स्टेशन भागात त्यांचा एक फ्लॅट आहे, चार महिन्यांपूर्वी ओयोमार्फत या दोन महिलांनी त्यांचं घर भाड्याने घेतले होते. या दोघी बहिणी होत्या. मालक महिन्याला भाडे घेण्यासाठी कोणालातरी फ्लॅटवर पाठवत असे.बुधवारी देखील घरमालक भाडे वसूल करायला गेला असता तेथील रहिवाशांनी त्याला सांगितले की, काही दिवसांपासून फ्लॅटमधून दुर्गंध येत आहे आणि सदर फ्लॅटमध्ये राहणाऱ्या दोन मुली फार काळ दिसल्या नाही. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले.पोलिसांना माहिती मिळाली आणि फॉरेन्सिकची टीमच्या मदतीने दरवाजा तोडून पोलिसांचे पथक आत गेले आणि तेथील दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला. दोन्ही मुलींचे मृतदेह खोलीत जमिनीवर पडले होते आणि त्यांच्या गळ्याला अडकलेला दोरखंड खोलीतील खिडकीशी बांधला होता. दोघांच्याही गळ्याला दोरीचे फास होते आणि मृतदेह कुजलेले होते.

मृतदेहाची अवस्था पाहून हे प्रकरण आत्महत्या झाल्याचे दिसत होते. परंतु खोलीत पडलेला मृतदेह आणि फक्त दोन हात उंचावरील खिडकीतून लटकून ठेवल्याने आत्महत्या होऊ शकते का संशय पोलिसांना आहे. आभा शुक्ला आणि रेखा शुक्ला असं या दोन बहिणींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांचा मृत्यू कसा झाला हे पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच स्पष्ट होईल. त्याचवेळी, फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून जप्त केलेल्या सर्व गोष्टींचा बारकाईने परीक्षण केला जाईल. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. घटनास्थळावरून सुसाइड नोटही सापडली नाही.या घटनेची माहिती देताना कानपूर पश्चिम एसपी अनिल कुमार यांनी सांगितले की, फ्लॅटच्या आत दोन्ही मुलींचे मृतदेह सापडले. दरवाजा आतून बंद होता. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नाही. सापडलेल्या साहित्याच्या आधारे त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पोस्टमार्टमनंतर संपूर्ण परिस्थिती स्पष्ट होईल. 

 

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसDeathमृत्यूSuicideआत्महत्या