शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

साहेब माझं लग्न लावून द्या!  महिला पोलिसाने वरिष्ठांकडे पोहोचताच पोलीस अधिकाऱ्याचे बदलले सूर; म्हणाला लग्नासाठी तयार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 17:16 IST

Police inspector is pleading with the police officers to get married to the female si - घाटमपूर कोतवाली येथे तैनात निरीक्षक एटा येथील रहिवासी आहेत. कल्याणपूर कोतवाली येथे निरीक्षक तैनात म्हणून होता तेव्हा त्याचे एका महिला एसआयबरोबर प्रेमसंबंध होते.

ठळक मुद्देतो एसआयची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहे आणि म्हणत आहे की, तू माझ्याशी लग्न करशील का?

कानपूर - कानपूर पोलिसांकडून एक विचित्र प्रेमकथा समोर आली आहे. पोलिस विभाग ते शहरापर्यंत ही प्रेमकथा चर्चेचा विषय बनला आहे. कानपूरच्या घाटमपूर कोतवाली येथे तैनात एका पोलीस निरीक्षकाचे एका महिला एसआयबरोबर प्रेमसंबंध होते. गेल्या दोन वर्षांपासून दोघांमधील प्रेमप्रकरण सुरू होते. काही कारणांमुळे, पोलीस निरीक्षकाने लग्नास नकार दिला आणि महिला एसआयला मारहाण केली. ही बाब अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच पोलीस निरीक्षकाचा सूर बदलला. आता निरीक्षक म्हणतोय की सर, माझे लग्न करून द्या. यासह, तो एसआयची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहे आणि म्हणत आहे की, तू माझ्याशी लग्न करशील का?घाटमपूर कोतवाली येथे तैनात निरीक्षक एटा येथील रहिवासी आहेत. कल्याणपूर कोतवाली येथे निरीक्षक तैनात म्हणून होता तेव्हा त्याचे एका महिला एसआयबरोबर प्रेमसंबंध होते. त्यावेळी त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दलही बरीच चर्चा होती. निरीक्षकाची घाटमपूर कोतवाली येथे बदली झाली. यानंतरही मोबाईल फोनवरून दोघांमध्ये बातचीत होत होती. यासह बैठकही झाली. महिला एसआय सतत पोलीस निरीक्षकावर लग्नासाठी दबाव आणत होती. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होता, यामुळे निरीक्षक महिला एसआयशी बोलत नव्हता. रविवारी ही एसआय महिला निरीक्षकाच्या अधिकृत निवासस्थानी पोहोचली. त्याने निरीक्षकासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला असता निरीक्षकाने एसआयला मारहाण केली. तिला तिच्या प्रियकराविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करावा लागला असे सांगून ही महिला एसआय आपल्या घरी परतली.उच्च अधिकाऱ्यांनी अहवाल मागितलाविभागीय असल्याने घाटमपूर कोतवाली समोरील सरकारी निवासस्थानी एका महिला एसआयला मारहाण  झाल्याची घटना दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. घाटमपूर कोतवालीचे पोलिस निरीक्षक व पोलिस काही बोलण्यास टाळाटाळ करू लागले, परंतु जेव्हा ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली तेव्हा त्यांनी घाटमपूरच्या पोलीस निरीक्षकाजवळ संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागितला.पोलीस निरीक्षकाचा बदलला सूरजेव्हा प्रेम प्रकरण प्रकरणाची माहिती उच्च अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली तेव्हा निरीक्षकाचा स्वर बदलला. पोलीस निरीक्षक आता अधिकाऱ्यांना सांगत आहेत की सर, आमचे लग्न लावून द्या. यासह निरीक्षक महिला एसआयची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. एसआयला तो म्हणत आहे की, मी लग्नासाठी तयार आहे, तू माझ्याशी लग्न करशील का?

घाटापूर कोतवाल धनेश प्रसाद यांचे म्हणणे आहे की, ही संपूर्ण बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली जाईल. सध्या निरीक्षक लग्न करण्यास तयार आहे. तरीही महिलेला पोलिस अधिकाऱ्याविरोधात अहवाल नोंदवायचा असेल तर तिच्यावर कारवाई केली जाईल.

टॅग्स :marriageलग्नKanpur Policeकानपूर पोलीसPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश