शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

साहेब, न्याय पाहिजे!, भाचीचा कापलेला पाय घेऊन असहाय्य मामा पोहोचला पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 20:52 IST

Dowry Case :कुटुंबीयांनी तेथे उपस्थित पोलिसांना विनवण्या करून न्याय हवा असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

बिहारच्या भोजपूरमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे, जो तुम्हाला हादरवेल. हुंड्यासाठी विवाहित मुलीला जाळल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी मुलीच्या जळालेल्या पायाचा काही भाग पुरावा म्हणून न्यायासाठी पोलीस ठाण्यात नेला. कुटुंबीयांनी तेथे उपस्थित पोलिसांना विनवण्या करून न्याय हवा असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.हे धक्कादायक प्रकरण आराच्या मुफस्सिल पोलीस ठाण्यातील आहे. याच परिसरातील बरौली गावात हुंड्याच्या लोभापायी आरोपींनी आधी नवविवाहितेचा गळा आवळून खून केला आणि नंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जमिनीत गाडला. यानेही मन भरले नाही म्हणून त्यांनी मृतदेह जाळला. हा प्रकार मृताच्या कुटुंबीयांना समजताच त्यांनी घटनास्थळ गाठून मृताच्या अर्ध्या जळालेल्या पायावर सापडलेल्या पैंजणीवरून तिची ओळख पटवली.मोठ्या थाटामाटात लग्न झालेसंपूर्ण प्रकरण असे आहे.  मुफस्सिल पोलीस स्टेशनच्या बाभनगवान येथील रहिवासी अखिलेश बिंद यांची मुलगी ममता देवी हिचा विवाह  मुफस्सिलच्या बरौली गावातील रहिवासी शत्रुघ्न बिंदसोबत मे २०२१ मध्ये झाला होता. ममताचे आई-वडील गुजरातमधील राजकोटमध्ये मजूर म्हणून काम करत होते, त्यामुळे ममता तिच्या मामाकडे बरौली गावात बराच काळ राहत होती. मे 2021 मध्ये, ममताचे मामा बिगन बिंद यांनी तिच्या भाचीचे लग्न गावातील शत्रुघ्न बिंदसोबत मोठ्या थाटामाटात केले.लग्नाच्या वेळी माहेरच्या लोकांनी शत्रुघ्न बिंडला हुंडा म्हणून पैसे आणि इतर वस्तूही दिल्या. असे असतानाही शत्रुघ्न हा ममताला लग्नानंतर तिच्या आई-वडिलांकडून एक लाख रुपये हुंड्याची मागणी करून त्रास देत असे. एक लाख रुपये न मिळाल्याने शत्रुघ्नने कुटुंबीयांसह ममताची आधी हत्या केली. चांडी पोलीस ठाण्याच्या सारीपूर-विशूनपूर सोन नदी घाटाजवळ त्यांचा मृतदेह प्रथम वाळूत पुरण्यात आला. नंतर मन बदलल्यानंतर मृतदेह वाळूतून बाहेर काढून जाळला आणि घटनास्थळावरून पळ काढला.पैंजणावरून ओळख पटवली आश्चर्याची गोष्ट म्हणजे ममताची हत्या केल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी तिचा मृतदेह जाळण्यासाठी प्रवासी कार भाड्याने घेतली होती. मृतदेह वाळूमध्ये पुरल्यानंतर वाहन चालक वाहनासह परतला, मात्र तोपर्यंत स्थानिक ग्रामस्थांनी त्याला संशयावरून पकडले. दरम्यान, पोलिसांनाही माहिती देण्यात आली. येथे सासरच्या लोकांनी ममताचा मृतदेह वाळूतून काढून जाळण्यास सुरुवात केली आणि संधी पाहून आरोपींनी पळ काढला.ममताची हत्या करून तिचा मृतदेह सारीपूर सोन नदी घाटावर नेल्याची माहिती त्याच्या मामाला मिळाली. ते घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत मृतदेह जळाला होता. मृतदेह पूर्णपणे जळालेला नव्हता, त्यानंतर ममताचा अर्धा जळालेला पाय पाहून आणि तिच्या पायाच्या बोटात घातलेली मासोळी व पैंजाणीवरून तिच्या मामाने ममताला ओळखले  .तिघांविरुद्ध गुन्हा दाखलबुधवारी घडलेल्या या घटनेनंतर ममताचे मामा न्यायासाठी ममताचा अर्धा जळालेला पाय घेऊन मुफस्सिल पोलीस ठाण्यात पोहोचले, तेथे पोलिसांनी ममताच्या मामाच्या जबाबावरून ममताचा पती शत्रुघ्न बिंड आणि सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृतकाचे मामा. पोलिसांनी पुरावा म्हणून आणलेला अर्धा जळालेला पाय डीएनए चाचणीसाठी पाटणा येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला आहे.

सध्या मुफस्सिल पोलीस ठाण्याचे पोलीस मृतदेह ताब्यात घेणाऱ्या चालकाची चौकशी करत असताना ममताचा पती आणि इतर सासरच्या मंडळींना अटकेची कारवाई करत आहे. मुलीच्या मृत्यूची बातमी मिळताच ममताचे आई-वडील गुजरातहून आरा येथे येत आहेत.या प्रकरणी पोस्टमॉर्टमसाठी आलेल्या मुफस्सिल पोलीस स्टेशनच्या एसआयने कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिला. वरिष्ठ पोलीस अधिकारीही याप्रकरणी कॅमेरासमोर बोलण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत.

टॅग्स :dowryहुंडाRajasthanराजस्थानPoliceपोलिसDeathमृत्यूBiharबिहार