शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील शार्प शूटर संतोष जाधवला पुणे पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 03:46 IST

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील शार्प शूटर संतोष जाधव याचा शोध घेण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या एका पथकानं त्याला गुजरातमधून आज अटक केली.

पुणे :

पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणातील शार्प शूटर संतोष जाधव याचा शोध घेण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांच्या एका पथकानं त्याला गुजरातमधून आज अटक केली. त्याला रात्री उशिरा न्यायालयात हजर केले. अधिक तपासासाठी न्यायालयाने २० जून पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी याला दुजोरा दिला असून याबाबत अधिक माहिती सोमवारी सकाळी देण्यात येईल असे सांगितले. गेल्या सोमवारी मुसेवाला हत्याकांड प्रकरणात संतोष जाधव व सौरभ महाकाल यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केले होते.

दरम्यान, चार दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी महाकाल याला संगमनेर जवळून अटक केली होती. त्याच्या चौकशी साठी पंजाब पोलिसांचे पथक पुण्यात आले होते. मंचर येथील राण्या बाणखेले खून प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून पुणे ग्रामीण पोलीस संतोष च्या मागावर होते, त्यासाठी त्याचा गुजरात, राजस्थान मध्ये शोध घेतला जात होता. तो बिष्णोई टोळीत सहभागी झाल्याची पोलिसांना माहिती होती. मुसेवाला हत्याकांड प्रकरणात त्याचे नाव आल्याने त्याचा शोध ४ राज्यात घेतला जात होता. अखेर गुजरातमधून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे पुण्याचं कनेक्शन उघड; दोन मोठी नावं आली समोर  

संतोष जाधव हा आंबेगाव तालुक्यातील पोखरी गावाचा राहणार असून मंचरची त्याची सासुरवाडी आहे. संतोष जाधव हा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर मंचर येथील ओंकार बाणखेले यांच्या खून प्रकरणात मोक्का कारवाई करण्यात आली आहे. तेव्हापासून तो फरार होता. पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगार ओंकार ऊर्फ राण्या अण्णासाहेब बाणखेले याची हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यात संतोष जाधव याचे नाव निष्पन्न झाले होते. संतोष जाधव याच्यावर यापूर्वी चोरीचा गुन्हा दाखल होता. ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणात मोक्का कारवाई केली आहे. त्यानंतर संतोष जाधव हा  पुणे परिसरातून दूर हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान भागात गेला असून तेथे त्याने गुन्हेगारी टोळी तयार केल्याचे सांगितले जाते.  

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे