शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
3
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
4
पुण्याच्या वानवडी भागात ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा; ३०० ते ४०० ग्राम सोने घेऊन दरोडेखोर पसार
5
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
6
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
7
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
8
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
9
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
10
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
11
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
12
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
13
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
14
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
15
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
16
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
17
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
18
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
19
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

गुंड सिद्धेश अभंगेवर स्थानबद्धतेची कारवाई, नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 12:56 AM

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर ऊर्फ सिद्धेश ऊर्फ सिद्धू अभंगे (२७) याच्यावर ठाणे पोलिसांनी बुधवारी स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

ठाणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुख्यात गुंड सिद्धेश बाळा म्हसकर ऊर्फ सिद्धेश ऊर्फ सिद्धू अभंगे (२७) याच्यावर ठाणे पोलिसांनी बुधवारी स्थानबद्धतेची कारवाई करून त्याची नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली. तर, गुंड सौरभ वर्तक यालाही दोन वर्षांसाठी ठाण्यासह तीन जिल्ह्यांतून तडीपार केल्याची माहिती सूत्रांनी दिली.खंडणी उकळणे, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीररीत्या हत्यार बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी दहशत माजवणे, हाणामारीचे प्रकार करणे तसेच अमली पदार्थांची तस्करी करणे आदी विविध कलमांखाली दोघांविरुद्ध ठाण्यातील कोपरी, चितळसर आणि वर्तकनगर अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी सिद्धूसह त्याच्या आठ ते दहा साथीदारांविरुद्ध चितळसर पोलीस ठाण्यात रिव्हॉल्व्हर आणि लाठ्याकाठ्या घेऊन दहशत पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर, लगेचच त्याच्यावर कोपरी पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली आणखी एक गुन्हा दाखल झाला होता. या सर्वच गुन्ह्यांमध्ये त्याची जामिनावर सुटका झाली होती.दरम्यान, निवडणूक काळात उपद्रवी ठरणाऱ्या अशा गुंडांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अलीकडेच दिले होते. त्यानुसार, चितळसर पोलिसांनी सिद्धूच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांकडे सादर केला होता. त्यास पोलीस आयुक्तांनी मंजुरी दिली. गृहविभागानेही त्यास अनुमती दिली होती. याच अंतिम आदेशाची बजावणी टाळण्यासाठी तो भूमिगत राहून पोलिसांना हुलकावणी देत होता. तो या काळात अंबरनाथ, बदलापूर, कळवा, कल्याण, पुणे, सोलापूर, हैदराबाद आदी शहरांमध्ये आश्रय घेऊन आपल्या वास्तव्याचे ठिकाण सातत्याने बदलत होता. कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर, दत्ता गावडे आदींच्या पथकाने अखेर त्याचे वास्तव्याचे ठिकाण शोधून तो गोवा येथे पळण्याच्या तयारीत असताना चिपळूण रेल्वेस्थानकावर कोपरी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर, त्याला चितळसर पोलिसांनी त्याच्यावर २ आॅक्टोबर २०१९ रोजी नाशिक रोड येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेची कारवाई केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी सांगितले.गुंड सौरभ वर्तक दोन वर्षांसाठी तडीपारधर्मवीरनगर येथे राहणारा गुंड सौरभ वर्तक (३२) याच्यावरदेखील दोन वर्षांसाठी चितळसर पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. त्याला ठाणे, मुंबई आणि रायगड या तीन जिल्ह्यांतून हद्दपार केले आहे. वर्तक याच्याविरुद्ध खंडणी, दंगल, मारहाण करणे, शस्त्र बाळगणे आदी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

टॅग्स :Arrestअटक