शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

Shraddha Walker Murder Case: 'I Have Got News'; श्रद्धाचा हा मेसेज ठरला अखेरचा; तिला कायतरी सांगायचं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 11:25 IST

Shraddha Walker Murder Case: श्रद्धाचा मृत्यू होण्याच्या काही तासांपूर्वी तिने तिच्या मित्राला मेसेज केला होता.

नवी दिल्ली : लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने  मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली. त्याने हा गुन्हा रागाच्या भरात केल्याची कबुली दिल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती हाती लागली आहे.

श्रद्धाचा मृत्यू होण्याच्या काही तासांपूर्वी तिने तिच्या मित्राला मेसेज केला होता. ती चॅट आता समोर आली आहे. श्रद्धाने १८ मे रोजी सायंकाळी मित्राला मेसेज केला होता. परंतु ही शेवटची चॅट असेल, असं श्रद्धानेही विचार केला नसेल. श्रद्धाने मित्राला मेसेज करुन म्हटलं होतं की, 'I Have Got News' म्हणजेच 'माझ्याकडे एक माहिती आहे'. श्रद्धाने यानंतर आणखी एक मेसेज केला आहे, त्यामध्ये 'मी एक गोष्टीमध्ये खूप व्यस्त आहे', असंही म्हटलं आहे. मात्र या मेसेजवरुन श्रद्धाला काहीतरी सांगायचे होते, असं दिसून येत आहे.

आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. आफताबला श्रद्धाचे अवयव शोधण्यासाठी दोन तलावांजवळ नेण्यात येणार आहे, त्यापैकी एक मेहरौलीच्या जंगलात आणि दुसरा येथील मैदानगढीमध्ये आहे. जेथे त्याने श्रद्धाचे अवयव फेकले अशा एका तलावाचे रेखाचित्रदेखील दिल्याची माहिती वकिलांनी दिली. हत्येनंतर मृतदेह कापण्यासाठी वापरलेले करवत व ब्लेड गुरुग्राममध्ये फेकून दिल्याचे सांगण्यात आले.  त्याचा शोध पुन्हा घेतला जाणार आहे. 

'आफताब गळा दाबून मारहाण करतोय'; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली, पण...

दरम्यान, आफताबने अतिशय शांत डोक्याने १८ मे रोजी श्रद्धा हिची हत्या केली होती. यानंतर ५ जून रोजी आफताबने वसईतील एव्हरशाइन येथील भाड्याच्या घरातील सामान दिल्लीत मागवले होते. मीरा रोड येथील एका कंपनीला हे काम दिले होते. कंपनीच्या गोविंद यादव याची दिल्ली पोलिसांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याने सामान शिफ्ट करताना झालेल्या व्यवहाराची पावती पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीला सामान शिफ्ट करण्यासाठी २० हजार रुपये आफताबने गुगल-पेद्वारे भरले होते. एक आठवड्यात आम्ही सामान दिल्लीला पाठवले, असे यादव याने पोलिसांना सांगितले.

आफताबचा जबाब अन् संपूर्ण यंत्रणा कामाला लागली; अख्खा तलाव रिकामा केला, पण...

दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली-

श्रद्धा आणि आफताब यांचे सुरुवातीपासूनच भांडणं सुरु होती. २३ नोव्हेंबर २०२० रोजी श्रद्धाने आफताबविरोधात तक्रार दाखल केली होती. आफताब हा गळा दाबून मारहाण करत असल्याची तक्रार श्रद्धाने नालासोपारा पूर्वमधील तुळींज पोलीस ठाण्यात दाखल केली होती. मात्र १९ डिसेंबर २०२० रोजी श्रद्धाने ही तक्रार मागे घेतली असल्याचे समोर आले आहे. 

श्रद्धाने तक्रार दाखल केल्यानंतर तुळींज पोलिसांनी याबाबत कारवाई का केली नाही, तिने तक्रार मागे घेईपर्यंत पोलिसांनी वाट पाहिली, असे प्रश्न  उपस्थित करण्यात येत आहेत. दरम्यान, श्रद्धाच्या तक्रारीची माहिती देण्यास तुळींज पोलिसांनी टाळाटाळ केली असून ही माहिती तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगण्यात आले आहे. मात्र पोलिसांनी तेव्हाच कारवाई केली असती तर श्रद्धा आज या जगात असती, अशीही चर्चा रंगली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरDeathमृत्यूPoliceपोलिस