शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडापेक्षा अनुपमा हत्यकांड भयंकर; पतीनेच केले पत्नीच्या शरीराचे 72 तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 14:37 IST

shahdara murder case: सध्या देशभरात श्रद्धा हत्याकांडाची चर्चा होत आहे, पण डेहराडोनच्या अनुपमाचा यापेक्षाही भयंकररित्या खून झाला होता.

Shraddha Murder Case: पालघरच्या श्रद्धा वाकर नावाच्या तरुणीच्या हत्येने देशभरात खळबळ उडाली आहे. आफताब पूनावाला या तिच्या लिव्ह इन पार्टरने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा धक्कादायक खुलासा झाला. ही खळबळजनक घटना दिल्लीत घडली. आरोपीने ज्याप्रकारे श्रद्धाचे 35 तुकडे केले, ते अतिशय भयावह आहे. या प्रकरणाने डेहराडूनच्या प्रसिद्ध अनुपमा गुलाटी हत्याकांडाची आठवण करून दिली आहे. 17 ऑक्टोबर 2010 रोजी डेहराडूनच्या शांत दून व्हॅलीमध्ये या घटनेपेक्षाही भयानक घटना घडली होती.

नेमकं काय झालं?अनुपमा गुलाटी नावाच्या महिलेची तिचा पती राजेश याने हत्या करून मृतदेहाचे 72 तुकडे केले होते. त्यानंतर तो एक एक करून तुकडे लपवायचा. अनुपमाच्या कुटुंबीयांचे अनेक दिवसांपासून तिच्याशी बोलणे झाले नाही, यानंतर तिचा भाऊ सूरज 12 डिसेंबर 2010 रोजी दिल्लीहून डेहराडूनला पोहोचला. तिथे गेल्यानंतर त्याला बहिणीच्या हत्येची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. या प्रकरणी 2011 मध्ये डेहराडून पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते.

हत्या का आणि कशी केली?दिल्लीस्थित अनुपमा यांनी 1999 मध्ये राजेश गुलाटीसोबत प्रेमविवाह केला होता. राजेश हा व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. लग्नानंतर दोघेही 2000 साली अमेरिकेला गेले. तेथून भारतात परतल्यानंतर ते आपल्या दोन मुलांसह प्रकाश नगर, डेहराडून येथे स्थायिक झाले. भारतात परतल्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला. खुनाच्या दिवशीही दोघांमध्ये भांडण झाले होते. यादरम्यान अनुपमाचे डोके पलंगाच्या कोपऱ्यात आदळले, यानंतर राजेशने अनुपमाच्या तोंडावर उशी ठेवून तिचा खून केला.

मृतदेहाची अशी विल्हेवाट लावलीपोलिसांनी राजेशची चौकशी केली असता, हॉलिवूड चित्रपट पाहून अनुपमाच्या हत्येची योजना आखल्याचे समोर आले. आधी त्याने अनुपमाची हत्या केली, त्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी डीप फ्रीझर विकत घेऊन त्यात अनुपमाचा मृतदेह ठेवला. यानंतर मृतदेहाचे 72 तुकडे केले आणि हळूहळू मसुरीच्या जंगलात फेकणे सुरू केले. यादरम्यान, अनुपमाच्या भावाला सत्य समजले. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी राजेशला अटक करून न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने जन्मठेप आणि 15 लाखांचा आर्थिक दंडही ठोठावला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसdelhiदिल्ली