शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत बळजबरीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या मूर्तिकारास अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 14:41 IST

पीडित मुलीचे दुसरे वडील सोरतापवाडी येथे रूपेश उघडे याच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात कामाला होते...त्यामुळे मुलगी डबा घेऊन कारखान्यात जात असे.

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे दुसरे वडील घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने आलेल्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा उठवत अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी तब्बल सहा महिने बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. तसेच सदर बाब कोणास सांगितली तर आईसह मुलीला जीवे मारण्याची धमकी देणा-या मूर्तिकारास पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी पंधरा वर्षीय पीडित मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.रूपेश अनंत उघडे (वय ३०, सध्या रा. कुंजीरवाडी ता. हवेली, मुळ रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्यौ मूर्तिकाराचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१७ मध्ये सदर पीडित मुलीचे दुसरे वडील सोरतापवाडी येथे रूपेश उघडे याच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात कामाला होते. त्यामुळे मुलगी डबा घेऊन कारखान्यात जात असे. तसेच उघडे हा तिच्या वडिलांसमवेत सतत घरी जात होता. वडील मुलीला वारंवार मारहाण करत असत. जानेवारी २०१८ मध्ये वडील घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रूपेश उघडे याने त्याचा फायदा उठवला व त्या मुलीला भेटून तुझा पत्नीप्रमाणे तुज्या आईसह सांभाळ करेन असे सांगून खोलीत नेऊन  तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सदर प्रकारांची पुनरावृत्ती जून २०१८ पर्यंत वारंवार होत होती. सदर व्यक्ती आपल्या असाह्यतेचा फायदा उठवत आहे हे त्या पिडीत मुलीच्या लक्षात आले नंतर तिने विरोध केला. यावेळी त्याने आईसह तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. विद्यालयात नववी इयत्तेत शिक्षण घेण्यास सुरुवात केल्यानंतर उघडे हा तिची शाळा भरताना व सुटताना तो तेथे जावून तिला भेटण्याचा प्रयत्न करत असे. तसेच त्यावेळी शरीरसंबंधाबाबत कोणास काही सांगू नकोस असे म्हणून शरीरसंबंधाची मागणी करून त्रास देत होता. यामुळे सदर पीडित मुलगी शाळा सुटेपर्यंत वर्गांत न थांबता घरी जात होती. त्यामुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आले. सदर घटनेची कल्पना तिने आईला दिली.   स्पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले, पोलीस हवालदार नितिन सुद्रीक, प्रविण सांगळे यांनी मुळ गावी निघालेल्या रूपेश उघडे याला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान या करत आहेत.   

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरPuneपुणेRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक