शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

जुन्या वादातून युवकावर गोळीबार; 5 जणांवर गाडगेनगर पोलिसांनी नोंदविला गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 4:38 PM

Firing : या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी युवकाला प्रथम इर्वीन रूग्णालय व त्यानंतर नागपुर येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले.

ठळक मुद्दे फिरोज खान अजीस खान (३०, रा. हबीबनगर) असे गोळी लागलेल्या गंभीर जखमी युवकाचे नाव आहे.

अमरावती: जुन्या वादातून एका युवकावर पाच आरोपींनी संगनमत करून त्यातील तीन आरोपींनी त्याच्यावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या तर एका आरोपीने चाकूने जीवघेणा हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना गाडगेनगर ठाणे हद्दीतील वलगाव येथील अल अजीज हॉलसमोर बुधवारी रात्री १०.१५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जखमी युवकाला प्रथम इर्वीन रूग्णालय व त्यानंतर नागपुर येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचाराकरीता दाखल करण्यात आले.

फिरोज खान अजीस खान (३०, रा. हबीबनगर) असे गोळी लागलेल्या गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. इम्रान अशरफी (पठाण चौक),  इम्रान लंबा, कौशिक पडपा, आबीद खॉ, राजा खॉ, तसेच दोन ते तीन अज्ञात इसम असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पोलीससुत्रानुसार फिर्यादी अफरोज खॉ हाफीज खॉ(२९, रा. हबीब नगर) यांनी गाडगेनगर ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी यांचा मोठा भाऊ फिरोज खान हे त्याचा मित्र सुलतान सोबत घटनास्थळी बसले असता यातील आरोपी इम्रान अशरफी याच्या इशाऱ्यावरुन यातील तीन आरोपींतानी युवकावर गोळीबार केला त्यातील एक गोळी त्याच्या छातीत लागल्याने तो जाग्यावरच कोसळला तर याील राजा खॉ नावाच्या आरोपीने त्याच्यावर जीवघेणा चाकू हला चढविला त्यानंतर आरोपी पळून गेले. मित्राच्या व नागरिकांच्या मदतीने फिरोज खानला जखमी अवस्थेत येथील इर्विन रुग्णालयात आणले मात्र प्रकृती नाजूक असल्याने पुढील पुढील उपचारकरीता नागपुरला हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी पथकासह घटनास्थळाला भेटी दिली. पसार आरोपीच्या शोधार्थ पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. आरोपीविरुद्ध भादविची कलम ३०७,१४३,१४७,१४८,५०४,४/२५,३,२५,५(२७) नुसार गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.शहरात देशी कट्टे येतात कुठूनगत काही महिन्यांमध्ये राजापेठ, गाडगेनगर व नागपुरीगेट हद्दीत देशीकट्टा जप्तीच्या घटना घडल्या आहेत. दहा हजारापासून तर २५ हजार रुपयात अमरावती देशीकट्टा मिळत असल्याचे पोलिसांच्या तपासात आरोपीकडून निष्पन्न झाले आहे. सदर देशीकट्टा शहरात येथो कुठूुन व त्याचा मुळे सुत्राधार कोण? अस प्रश्न सामन्य लोकांना पडला असून शहरात गोळीबार करण्यात आलेल्या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी शहरात देशीकट्टा येतो कुठून  त्याचा मुळे सुत्रधाराला अटक करणे गरजचेे आहे.

टॅग्स :FiringगोळीबारAmravatiअमरावतीPoliceपोलिस