शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नियोजित नवरदेवाच्या हॉटेलवर गोळीबार, औरंगाबादमधील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 07:52 IST

आपल्याला नाकारणाऱ्या मुलीसोबत तुम्ही सोयरीक  करू नका, अशी धमकीपत्रे टाकत नकार मिळालेल्या तरुणाने नियोजित नवरदेवाच्या हॉटेलवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पडेगावातील रामगोपालनगरात घडली.

औरंगाबाद : आपल्याला नाकारणाऱ्या मुलीसोबत तुम्ही सोयरीक  करू नका, अशी धमकीपत्रे टाकत नकार मिळालेल्या तरुणाने नियोजित नवरदेवाच्या हॉटेलवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास पडेगावातील रामगोपालनगरात घडली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताला पकडण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. संशयित आरोपी हा तक्रारदाराचा चुलत भाचा असल्याचे सूत्राने सांगितले.  विशाल मनोहर गाडीलकर (रा. कोपर्डी, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे संशयिताचे नाव आहे. यावेळी त्याच्यासोबत अन्य एक जण होता. तक्रारदार मनीष किसनराव गायकवाड या तरुणाचे पडेगाव येथे हॉटेल आहे. अहमदनगर जिल्ह्यातील चुलत मामाच्या मुलीसोबत मनीषचा विवाह २५ एप्रिल रोजी होणार आहे. मनीषचे लग्न जमण्यापूर्वी आरोपी विशालने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली होती. मात्र, तिच्या आईवडिलांनी विशालचे स्थळ नाकारले होते. आपल्याला नाकारणाऱ्या मुलीचे लग्न चुलत मामा मनीषसोबत जमल्याचे विशाल आणि त्याच्या नातेवाइकांना समजले. त्यानंतर त्यांनी गायकवाड कुटुंबावर सोयरीक मोडण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. मात्र, तरीही गायकवाड कुटुंबाने मनीष आणि त्या तरुणीचा विवाह निश्चित केला. त्यानंतर आरोपी विशालने मनीषचे वडील किसन गायकवाड यांच्या व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवून त्या मुलीचा विचार सोडा असे नमूद केले होते. गायकवाड कुटुंबाने त्या मेसेजकडे दुर्लक्ष केले होते.   तब्बल १९ प्रतीत धमकीपत्र फेकले गायकवाड यांना घराच्या आवारात धमकी पत्राचा गठ्ठा आढळून आला. यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले. त्यात दुचाकीस्वार दोन तरुण त्यांच्या हॉटेलसमोर आल्याचे त्यांना दिसले. यापैकी हेल्मेट घातलेला तरुण कंपाउंड वॉलबाहेरून धमकी पत्र टाकतो व नंतर तो लॉजिंगच्या दिशेने येतो. पिस्तुलातून पहिल्या मजल्यावरील खिडकीवर गोळी झाडतो. यानंतर दुसरी गोळी स्वागत कक्षाच्या काचेवर झाडतो आणि साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेल्याचे दिसले. गोळीबार करणारा विशाल असल्याचा संशय बळावल्याने मनीषने त्याच्यासह अन्य आरोपीविरुद्ध छावणी ठाण्यात तक्रार नोंदविली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद