Mexico Shooting: थायलंडनंतर मेक्सिकोत गोळीबार; महापौरांसह १८ जणांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2022 16:01 IST2022-10-06T16:00:44+5:302022-10-06T16:01:09+5:30
सिटी हॉलच्या भिंतींवर गोळ्यांच्या खुना दिसत आहेत. शेजारील घरावर देखील गोळीबार करण्यात आला आहे.

Mexico Shooting: थायलंडनंतर मेक्सिकोत गोळीबार; महापौरांसह १८ जणांची हत्या
थायलंडमध्ये माजी पोलिसाने केलेल्या गोळीबारात ३४ जणांचा मृत्यू झालेला असताना आता अशीच घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे. बंदुकधाऱ्यांनी गेलेल्या गोळीबारात महापौरांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे. सॅन मिगुएल तोतोलापनच्या सिटी हॉलमध्ये हा गोळीबार झाला.
सिटी हॉलच्या भिंतींवर गोळ्यांच्या खुना दिसत आहेत. शेजारील घरावर देखील गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. सोशल मीडियावरील व्हिडीओत दहा-बारा लोकांचे मृतदेह आसपास पडलेल्या अवस्थेत दिसत आहेत. मेक्सिकोचे मेयर कॉनराडो मेंडोज़ा, त्यांचे वडील माजी मेयर जुआन मेंडोजा आणि काही पोलिस अधिकाऱ्यांचा देखील मृतांमध्ये समावेश आहे.
थायलंडमध्ये डे केअरवर गोळीबार
थायलंडच्या एका चाईल्ड सेंटरमध्ये भीषण घटना घडली आहे. लहान मुलांच्या या केंद्रात प्रचंड गोळीबार झाला असून यामध्ये कमीतकमी 34 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. देशाच्या ईशान्येकडील प्रांतात हा गोळीबार झाल्याचे पोलिस प्रवक्त्याने सांगितले आहे. हल्लेखोर माजी पोलिसाने आत्महत्या केली असून त्याने त्यापूर्वी पत्नी आणि मुलीलाही ठार केले आहे. गुरुवारी देशातील नॉन्ग बुआ लम्फू प्रांतातील लहान मुलांना सांभाळणाऱ्या डे-केअर सेंटरवर हा गोळीबार करण्यात आला. हल्लेखोर बँकॉकची लायसन्स प्लेट असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिकअप व्हॅनमधून पळून गेला.