Shooting in Chalisgaon, one injured, blockade in the city | चाळीसगावात गोळीबार, एक जण जखमी, शहरात नाकाबंदी  

चाळीसगावात गोळीबार, एक जण जखमी, शहरात नाकाबंदी  

चाळीसगाव (जि.जळगाव) : मोटारसायकलीवर आलेल्या दोन जणांनी केलेल्या गोळीबारात एक जखमी झाल्याची घटना घाटरोड परिसरात शनिवारी सायंकाळी सव्वा पाच वाजता घडली.  या घटनेनंतर शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. 

शेख जुगर शेख सलीम (बंबैय्या) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. त्याच्या मांडीवर गोळी लागली आहे.  त्याला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती  स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

घाटरोड परिसरातील हुडको भागात सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास  दोन जण मोटारसायकलवर आले आणि त्यांनी अचानक गोळीबार केला. यात तीन गोळ्या झाडल्या तर त्यातील एक गोळी हवेत,  दुसरी जमिनीवर तर तिसरी  गोळी शेख जुगर शेख सलीम याच्या मांडीला लागली आहे.

Web Title: Shooting in Chalisgaon, one injured, blockade in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.