शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयात पोलीस संरक्षणात असलेल्या आरोपींवर गोळीबार: उत्तर प्रदेशातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 16:07 IST

न्यायालयात तारखेसाठी आणलेल्या आरोपींवर गोळीबार, हल्लेखोर ताब्यात.

UP Firing: काही दिवसांपूर्वी पोलीस संरक्षणात असलेल्या माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येची घटना घडली होती. अशाच प्रकारची एक घटना जौनपूरच्या दिवाणी न्यायालयात घडली आहे. हत्या प्रकरणातील दोन आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी काही हल्लेखोरांनी त्या दोघांवर गोळीबार सुरू केला. 

6 मे 2022 रोजी गौराबादशाहपूर पोलिस स्टेशन हद्दीतील धर्मपूर येथे कुस्तीपटू बादल यादव यांची हत्या झाली होती. त्या हत्येत सूर्य प्रकाश राय आणि मिथिलेश गिरी हे आरोपी आहेत. या दोघांनाही आज दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाशेजारील दिवाणी न्यायालयात पोहोचताच हल्लेखोरांनी दोन्ही आरोपींवर गोळीबार सुरू केला. 

यावेळी घटनास्थळी उपस्थित वकिलांनी हल्लेखोरांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने पोलीस फौजफाट्यासह दिवाणी न्यायालयात दाखल झाले. जखमी सूर्यप्रकाश राय आणि मिथिलेश गिरीलाही जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. येथे प्राथमिक उपचारानंतर दोघांना वाराणसीला रेफर करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती गंभीर आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार