शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कुत्र्याचं नाव 'सोनू' ठेवल्यानं गुजरातमध्ये महिलेला जिवंत जाळलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 09:31 IST

नीताबेन सरवैया असं या महिलेचं नाव असून भावनगर येथील सरकारी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली असून महिलेची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे

ठळक मुद्देनीताबेन यांच्या घरी आलेल्या भरवाड यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच, त्यांच्यासमवेत आलेल्या इतर तिघांनी किचनमध्ये जाऊन त्यांचा पाठलाग केला.

अहमदाबाद - गुजरातच्या भावनगर येथे धक्कादायक घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. येथील एका महिलेनं आपल्या कुत्र्याचं नाव शेजारील महिलेच्या नावासमान ठेवलं होतं. त्यावरुन, झालेल्या वादात शेजारील व्यक्तीने चक्क महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात येत आहे. नावावरुन झालेल्या भांडणातून शेजारील महिलेच्या पतीने कुत्र्याची मालकीन असलेल्या महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. 

नीताबेन सरवैया असं या महिलेचं नाव असून भावनगर येथील सरकारी रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनेची दखल घेतली असून महिलेची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली आहे. याप्रकरणात महिला गंभीर जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीताबैन सुरवैया यांचे पती आणि दोन्ही मुलं बाहेर गेले होते. सोमवारी आपल्या लहान मुलासमवेत त्या घऱीच होत्या. त्यात, दुपारच्यावेळेत त्यांचे शेजारी सुराभाई भरवाड आणि इतर 5 जणांनी नीताबेन यांच्या घरी जाऊन गोंधळ घातला. सुरवैया यांनी आपल्या कुत्र्याचं नाव सोनू ठेवलं होतं. त्यामुळे भरवाड यांनी तीव्र आक्षेप घेत संताप व्यक्त केला. तसेच, जाणूनबुजून या कुत्र्याचं नाव माझ्या पत्नीच्या नावासमान ठेवल्याचा आरपोही त्यांनी केला होता. 

नीताबेन यांच्या घरी आलेल्या भरवाड यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. तसेच, त्यांच्यासमवेत आलेल्या इतर तिघांनी किचनमध्ये जाऊन त्यांचा पाठलाग केला. त्यापैकी, एकाने रॉकेलचा डब्यातील तेल सुरवैया यांच्या अंगावर टाकले आणि आगपेटीने काडी लावून जाळल्याचा आरोप फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. दरम्यान, महिलेच्या जोरजोरात ओरडण्याच्या आवाजाने शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याचवेळी महिलेचे पतीही तेथे आले अन् त्यांनी अंगात परिधान करणाऱ्या कोटने ही आग विझवली. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिसfireआगWomenमहिलाdogकुत्रा