शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! उन्नावमध्ये तरुणीने तरुणावर फेकले अ‍ॅसिड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 17:47 IST

पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेत एकतर्फी प्रेमाचे प्रकरण असल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिले आहेत.

ठळक मुद्देजखमी झालेल्या तरुणास लखनऊच्या पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि पीडित तरूण हे एकमेकांचे शेजारी आहेत. दोघे देखील वेगवेगळ्या धर्माचे असून हे दोघे बराच काळ एकमेकांशी संपर्कात होते अशी माहिती मिळत आहे. 

उन्नाव - अ‍ॅसिड हल्ल्याचा बळी पडलेल्या तरुणीवर आधारित छपाक या चित्रपटाच्या चर्चेदरम्यान उत्तर प्रदेशमधील एका तरूणावर अ‍ॅसिड हल्ल्याची घटना उघडकीस आली आहे. उन्नावच्या मौरवनमध्ये एका तरुणीने तरूणावर अ‍ॅसिड फेकले. जखमी झालेल्या तरुणास लखनऊच्या पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप अ‍ॅसिड हल्ल्याची माहिती दिलेली नाही. पोलिसांनी आरोपी तरुणीला ताब्यात घेत एकतर्फी प्रेमाचे प्रकरण असल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांनी दिले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणी आणि पीडित तरूण हे एकमेकांचे शेजारी आहेत. दोघेही मौरावा परिसरातील गोनामाऊचे रहिवासी आहेत. पीडित तरुण डेअरी चालविण्याचे काम करतो. सोमवारी रात्री उशिरा दोन वाजताच्या सुमारास तो टँकरमध्ये दूध पाठवून डेअरी साफ करीत होता. या वेळी आरोपी तरुणीने त्या तरुणावर अ‍ॅसिड फेकल्याचे पोलिसांनी सांगितले.या अ‍ॅसिड हल्ल्यात तरूणाचा गळा, कान, छाती व मागील भाग जळून गेलेला आहे. जखमींना ताबडतोब लखनऊच्या पल्स या खासगी रुग्णालयात येथे दाखल करण्यात आले आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे ही घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे. दोघे देखील वेगवेगळ्या धर्माचे असून हे दोघे बराच काळ एकमेकांशी संपर्कात होते अशी माहिती मिळत आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकUttar Pradeshउत्तर प्रदेश