धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर तीन दिवस आळीपाळीनं बलात्कार, आरोपी बाबाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2020 17:57 IST2020-01-31T17:57:14+5:302020-01-31T17:57:26+5:30
हरयाणातल्या पंचकुला पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी स्वयंभू बाबाला अटक केली आहे.

धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर तीन दिवस आळीपाळीनं बलात्कार, आरोपी बाबाला अटक
पंचकुलाः हरयाणातल्या पंचकुला पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी स्वयंभू बाबाला अटक केली आहे. बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेला बाबा स्वामी लक्ष्यानंद सरस्वती पंचकुलाच्या रायपुरानीतल्या त्रिलोकपूरमध्ये लक्ष्यानंद आश्रम चालवतो. पोलिसांनी हिमाचलच्या बद्दीतल्या दोन मुलींच्या तक्रारीवरून आरोपी बाबाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही मुली आश्रममध्ये सेवा करण्यासाठी छोटा त्रिलोकपूरमध्ये गेल्या होत्या. ज्यांच्याबरोबर कथित स्वरूपात तीन दिवस आळीपाळीनं बलात्कार करण्यात आला.
पंचकुला महिला पोलीस ठाण्याचे अधीक्षक नेहा चौहान यांनी प्रकरणाची खात्री केलेली असून, पीडित मुलींची वैद्यकीय चाचणीसुद्धा करण्यात आली होती. पोलिसांना आता वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी आरोपी बाबाला अटक केल्यानंतर त्याच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी केली. तो बाबा प्रत्येक रविवारी स्वतःच्या आश्रमात मोठी गर्दी जमवत होता. त्यात अनेक महिलांचाही समावेश असायचा. एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं की, बाबाच्या हालचाली संशयास्पद होत्या. परंतु या बाबांवर स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. बाबाला अटक केलेली असून, लवकरच त्यांच्याकडून सत्य वदवून घेतलं जाणार आहे. तसेच बाबानं आणखी काही महिलांबरोबर असं गैरकृत्य केलेलं आहे का?, हे तपासातूनच उघड होणार आहे.