शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक घटना! प्रियकराने केला 'डर'मधील 'शाहरुख खान' बनण्याचा प्रयत्न, कुटुंबाला धरले ओलीस, त्यानंतर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2022 21:11 IST

Crime News: बिहारमधील  बेतिया येथे एका सणकी प्रियकराने तब्बल सहा तास तुफान गोंधळ घातला. या प्रियकराने सुरुवातीला फिल्मी स्टाईलमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून प्रेयसीच्या कुटुंबीयांना ओलीस धरले. त्यानंतर पोलीस बोलण्यासाठी गेले असता त्यांनाही ओलीस धरले.

पाटणा - बिहारमधील  बेतिया येथे एका सणकी प्रियकराने तब्बल सहा तास तुफान गोंधळ घातला. या प्रियकराने सुरुवातीला फिल्मी स्टाईलमध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून प्रेयसीच्या कुटुंबीयांना ओलीस धरले. त्यानंतर पोलीस बोलण्यासाठी गेले असता त्यांनाही ओलीस धरले.

ही घटना बानूछापर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महेंद्र कॉलनीमधील आहे. येथे शिक्षक अरुणकुमार राय यांच्या घरामध्ये सहा लोक सुमारे सहा तास ओलीस राहिले.  त्याचे झाले असे की, सतीश नावाचा एक सणकी तरुण शिक्षकांच्या मुलीच्या एकतर्फी प्रेमात पडला होता. मात्र त्या तरुणीने नकार दिल्यावर त्याने फिल्मी स्टाईलमध्ये सदर तरुणी आणि तिच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवून ओलीस धरले.

जेव्हा पोलीस या कुटुंबाला सोडवण्यासाठी घटनास्थळावर पोहोचले तेव्हा आरोपीने त्यांनाही ओलीस धरले. त्यानंतर बेतिया पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवत सदर युवकाला पकडले आणि अटक केली. त्यानंतर सहा तास चाललेल्या या नाट्याची अखेर झाली. सदर तरुण हा मोतिहारीमधील गोविंदगंज येथील रहिवासी आहे. तो या शिक्षकाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. प्रेमात अपयशी ठरल्याने त्याने प्रेयसीच्या संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतले होते.

या घटनेबाबत बेतियाचे एसपी उपेंद्रनाथ वर्मा यांनी सांगितले की, एका सणकी तरुणाने बंदुकीचा धाक दाखवत संपूर्ण कुटुंबाला ओलीस धरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत या तरुणाला अटक केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारPoliceपोलिस