शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विद्यार्थ्याने केवळ ४५ रुपयांच्या प्रवेशासाठी गमावले ६० हजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2019 13:31 IST

गुन्हा दाखल : ऑनलाईन ठगांकडून फसवणूक

ठळक मुद्देबोरीवलीतील रहिवासी असलेला फोरम जैन (२०) यांची यात फसवणूक झाली आहे.दोन्ही प्रकरणांची एकत्र तक्रार नोंद करीत बोरीवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.खात्यातून ६० हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश मोबाइलवर आला.

मुंबई - गुगलवरून गाडी सर्व्हिसिंग सेंटरचा मोबाइल क्रमांक मिळविणे बोरीवलीतील विद्यार्थ्याला भलतेच महागात पडले. ठगाने गाडी सर्व्हिसिंगच्या प्रवेशासाठी ४५ रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले. पण हे करत असताना या विद्यार्थ्याच्या खात्यातून ६० हजार रुपये काढले. या प्रकरणी बोरीवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.बोरीवलीतील रहिवासी असलेला फोरम जैन (२०) यांची यात फसवणूक झाली आहे. तो एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत आहे. २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ च्या सुमारास तो कारच्या सर्व्हिसिंगसाठी गुगलवरून जवळच्या सर्व्हिस सेंटरचे मोबाइल क्रमांक शोधत होता. त्यातून मिळालेल्या क्रमांकावरून त्याने संपर्क साधला. तेव्हा संबंधिताने गाडी सर्व्हिसिंगसाठी प्रवेश फी म्हणून ४५ रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करण्यास सांगितले. कॉल सुरू असतानाच अन्य क्रमांकावरून मिसकॉल आला. संबंधित कॉलधारकाने, मिसकॉल आलेल्या क्रमांकावर कॉल करण्यास सांगितले.त्या क्रमांकावरून संपर्क साधताच आरोपीने त्यांना एक गुगल अर्ज पाठवून त्यात यूपीआय पिन भरण्यास सांगितला. त्यात, मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांकही नमूद करण्यास सांगितला. तरुणाने अर्ज भरताच त्याच्या खात्यातून ६० हजार रुपये काढण्यात आल्याचा संदेश मोबाइलवर आला. या घटनेमुळे जैनला धक्काच बसला. त्याने तत्काळ पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.

महिलेच्या खात्यावर डल्ला

जैन तक्रार देत असतानाच, दिशा धिरेन गाला (४५) यांनाही कार्ड ब्लॉक झाल्याची भीती घालून ऑनलाईन ठगांनी ४९ हजार ४९० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली. त्यांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्याकडून मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक घेत, ही फसवणूक केली. दोन्ही प्रकरणांची एकत्र तक्रार नोंद करीत बोरीवली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :ArrestअटकonlineऑनलाइनfraudधोकेबाजीPoliceपोलिस