शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 'तो' पालिकेचा उपायुक्त सापडला बारमध्ये अश्लील चाळे करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 14:38 IST

सात जण सापडल्याची माहिती समोर येत आहे. 

ठळक मुद्देहे सात जण सापडल्याची माहिती समोर येत आहे. कुलाबा परिसरातील प्लॅटिनम बिअर बार हा बारसाठी असलेल्या वेळेच्या मर्यादेहून अधिक काळ सुरू असतोपोलिसांनी बिअर बारला टाळं ठोकलं असून चार बारबालांची सुटका करण्यात आली आहे.

मुंबई - कुलाबा परिसरातील बिअर बारमध्ये अश्लील चाळे केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी महापालिका उपायुक्तासह सहा जणांना ताब्यात घेतलं आहे. प्लॅटिनम या बिअर बारवर टाकलेल्या धाडीतपोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यात हे सात जण सापडल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी बिअर बारला टाळं ठोकलं असून चार बारबालांची सुटका करण्यात आली आहे.

कुलाबा परिसरातील प्लॅटिनम बिअर बार हा बारसाठी असलेल्या वेळेच्या मर्यादेहून अधिक काळ सुरू असतो. तसेच इथे काही बेकायदेशीर कृत्य देखील होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे बुधवारी पोलिसांनी बारवर धाड टाकली. तेव्हा तिथे ऑर्केस्ट्रा सुरू असल्याचं पोलिसांना आढळून आलं. रात्री सव्वा बाराच्या सुमाराला बार बंद करण्याचं सोडून कर्मचारी ग्राहकांना दारू पाजत होते. त्याचप्रमाणे ऑर्केस्ट्राच्या तालावर काही बारबाला नृत्यही करत होत्या. त्यातील काही जणींचे हावभाव हे अश्लील होते. तिथे आलेल्या ग्राहकांपैकी काहीजण बारबालांवर पैसे उथळण्यात तर काही जण त्यांच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी मोबाईलमध्ये या सगळ्या प्रकाराचं शूटिंग केलं आणि बारवर धाड घातली आहे. या धाडीत पोलिसांनी ज्या १५ जणांना ताब्यात घेतलं त्यात ९ बार कर्मचारी तर ६ ग्राहकांचा समावेश आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्राहकांपैकी एक जण तर  महापालिका उपायुक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. पालिके अधिकारी असून देखील बारबालांसोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी त्यालाही ताब्यात घेण्यात आलं आहे. याशिवाय चार जण व्यावसायिक तर एक जण वरिष्ठ सरकारी कर्मचारी असल्याचं स्पष्ट झालं आहे.

टॅग्स :raidधाडMuncipal Corporationनगर पालिकाPoliceपोलिसArrestअटक