Shocking! Six members of the same family ingested poisonous, three Three Death | धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांनी प्राशन केले विषारी औषध, तीन जणांचा मृत्यू

धक्कादायक! एकाच कुटुंबातील सहा जणांनी प्राशन केले विषारी औषध, तीन जणांचा मृत्यू

बडोदा - गुजरातमधील बडोदा शहरात एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, उर्वरित तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Vadodara)मिळत असलेल्या माहितीनुसार हे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यामुळे या कुटुंबातील सदस्यांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. (Six members of the same family ingested poisonous, three Three Death in Gujarat)

ही घटना बडोद्यामधील समा परिसरातील स्वाती सोसायटीमध्ये घडली आहे. येथील सहा जणांनी विषारी औषध पिऊन सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे. विषारी औषध प्राशन केल्यामुळे तीन जणांचा मृत्यू तर कुटुंबातील अन्य तीन अन्य लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत.

याबाबत बडोद्याचे एसीपी भारत राठोड यांनी सांगितले की, शेजाऱ्यांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार हे कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करत होते. मात्र सध्यातरी या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. तर गंभीर अवस्थेत असलेल्या तीन जणांवर उपचार सुरू आहेत. 

सध्या या घटनेच्या खऱ्या कारणांचा खुलासा अद्याप झालेला नाही. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या लोकांच्या जबानीनंतर काही बाबी स्पष्ट होणार आहेत. मात्र सध्यातरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत पोलीस तपास सुरू आहे. 

Web Title: Shocking! Six members of the same family ingested poisonous, three Three Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.