खळबळजनक! न्यूझीलंडच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेला मृतदेह ठाणेकर महिलेचा ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 12:59 IST2018-11-27T12:58:47+5:302018-11-27T12:59:17+5:30

तो मृतदेह सोनम शेलार या बेपत्ता झालेल्या महिलेचा असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. तपासासाठी पोलिसांनी स्थानिकांना मदतीचं आवाहन केलं आहे.

Shocking! Similar Dead Body like Thanekar Woman Found in New Zealand Sea Coast | खळबळजनक! न्यूझीलंडच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेला मृतदेह ठाणेकर महिलेचा ? 

खळबळजनक! न्यूझीलंडच्या समुद्र किनाऱ्यावर सापडलेला मृतदेह ठाणेकर महिलेचा ? 

न्यूझीलंड -  न्यूझीलंडमधील वेलिंग्टन येथील वाइरारापा समुद्र किनाऱ्यावर एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह भारतीय वंशाच्या महिलेचा असल्याची शक्यता स्थानिक पोलिसांनी वर्तवली आहे. वाइरारापा समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, तो मृतदेह सोनम शेलार या बेपत्ता झालेल्या महिलेचा असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. तपासासाठी पोलिसांनी स्थानिकांना मदतीचं आवाहन केलं आहे.  

 मूळ भारतीय वंशाच्या महाराष्ट्राच्या ठाण्यातील सोनम शेलार ही महिला गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता आहे आणि तिचा शोध घेणं सुरू आहे. पाच महिन्यांच्या गर्भवती असलेल्या सोनम शेलार या महिलेला शनिवारी त्यांच्या निवासस्थानी शेवटचं पाहण्यात आलं. त्यानंतर ती महिला बेपत्ता झाली आहे. वेलिंग्टन पोलीस महिलेच्या निवासस्थान आणि सभोवतालच्या परिसराचं सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत. शेलार यांच्या नातेवाईकांवर पोलिसांना संशय आहे.

Web Title: Shocking! Similar Dead Body like Thanekar Woman Found in New Zealand Sea Coast