शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 4 वर्षाच्या चिमुरडीचे अपहरण करून नराधमाने केले लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 20:16 IST

याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपहरणाचा आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आला असून हा गुन्हा भांडुप पोलीस ठाण्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

ठळक मुद्देतानसा पाईप लाईन भागात आज अतिशय धक्कादायक घटना घडली आहेभांडुप येथून 4 वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक शोषण करणाऱ्या दोन सतर्क तरुणांनी आरोपीला मुलुंड पोलिसांच्या ताब्यात दिलेमुलुंड पोलीस ठाण्यात अपहरणाचा आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला

मुंबई - मुलुंड आणि भांडुप या दोन्ही परिसरांना जोडणाऱ्या तानसा पाईप लाईन भागात आज अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. भांडुप येथून ४ वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक शोषण करणाऱ्या दोन सतर्क तरुणांनी आरोपीला मुलुंड पोलिसांच्या ताब्यात दिले. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपहरणाचा आणि पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आला असून हा गुन्हा भांडुप पोलीस ठाण्यात वर्ग करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद काळे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

३८ वर्षीय आरोपी पीडित चिमुकलीच्या शेजारीच राहतो. या नराधमाची त्या चिमुकलीवर दृष्ट नजर होतीच, आज डाव साधत चिमुकली खेळत असताना तिला खाऊचे आमिष दाखवून त्याने भांडुप येथून चिमुकलीचे अपहरण केले आणि तिला तानसा पाईप लाईन परिसरातील झाडी असलेल्या भागात नराधम आरोपी घेऊन गेला. त्यानंतर जंगलात तिच्यावर लैंगिक शोषण या नराधमाने केले. दरम्यान चिमुकीच्या रडण्याचा आवाज सारवनसिंग पदा (वय २५) आणि टिंकू भारीचा (वय २४) या दोन तरुणांच्या कानी पडला. ही दुर्दैवी घटना आज दुपारी अडीज वाजताच्या सुमारास घडली. दोन तरुणांच्या कानी आवाज पडल्यानंतर ते झाडीत गेले. त्यावेळी या दोन्ही तरुणांनी अतिशय भयानक दृश्य पहिले आणि एक तरुण चिमुकलीला घेऊन झाडीतून बाहेर पळून आला. या तरुणांनी ३८ वर्षीय आरोपीला जाब विचारला असता माझी मुलगी असल्याचा त्याने खोटा दावा केला. नंतर तरुणांना संशय आल्याने नागरिकांच्या मदतीने त्यांनी मुलुंड पोलिसांच्या ताब्यात आरोपीला दिले. मुलुंड पोलिसांनी ३८ वर्षीय आरोपीला अटक केली असून याप्रकरणी भा. दं. वि. कलम गुन्हा दाखल करून तो भांडुप पोलीस ठाण्यात वर्ग केला जाणार असल्याची माहिती काळे यांनी दिली.     

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरणRapeबलात्कार