शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरातच चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 16:50 IST

या प्रकरणी माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ठळक मुद्दे३२ वर्षीय तक्रारदार या दादर रेल्वे पोलीस वसाहतीतील पोलीस निरीक्षक इमारतीत राहतात.सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतल्या तेव्हा, कुलूप बाजूला पडलेले होते. सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान या घटना घडल्या आहेत.

मुंबई - दादर रेल्वे पोलीस वसाहतीत राहणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरातचोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. यात, साहाय्यक पोलीस निरीक्षक महिलेच्या घरातून ५० हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी माटुंगा पोलीस अधिक तपास करीत आहेत.३२ वर्षीय तक्रारदार या दादर रेल्वे पोलीस वसाहतीतील पोलीस निरीक्षक इमारतीत राहतात. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पती नेहमीप्रमाणे घराबाहेर पडले. त्यापाठोपाठ त्यादेखील ११ च्या सुमारास कामावर गेल्या. सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतल्या तेव्हा, कुलूप बाजूला पडलेले होते. त्यांनी घरात प्रवेश करताच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. दागिन्यांसह ५० हजारांचा ऐवज चोरीला गेला होता. त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दिली. त्याचवेळी त्यांच्या शेजारील पोलीस उपनिरीक्षक इमारतीत राहणारे आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रवीण निळकंठ सावंत यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न झाल्याचे समजले. सावंत यांचे सासरे कमलाकर शंकर दांडेकर (६६) यांनी त्यांना याबाबत कळविले. सावंत घरात नसताना, लुटारूने त्यांच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला आणि ड्रेसिंग टेबल उघडलेला दिसला. मात्र घरातून काहीही चोरीला गेलेले नाही.सकाळी ११ ते सायंकाळी ६ दरम्यान या घटना घडल्या आहेत. या प्रकरणी अधिक तपास करत असल्याची माहिती माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत भोईटे यांनी दिली.

यापूर्वीच्या घटना...

* ३ जुलै २०१९ - मरोळ पोलीस वसाहतीतील रहिवासी चंद्रकांत बागल (५८) सोन्याचे दागिने व ५१ हजारांची रोकड चोरीला गेली. ते मुंबई पोलीस दलात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत.*३० नोव्हेंबर २०१८ - नातेवाइकाच्या लग्नासाठी पुण्यात गेलले प्रदीप ज्ञानदेव खरात (३३) यांच्या घरातून ११ हजारांच्या रोकडीसह दागिने चोरीला गेले होते. ते माहिमच्या नवीन पोलीस वसाहतीत राहतात.*१९ एप्रिल २०१८ - चुनाभट्टीतील पंचशीलनगर परिसरात मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले संदीप रामचंद्र झाडे यांच्या घरातून ४२,५०० रुपयांची चोरी झाली.*२९ जुलै २०१७ : राज्य दहशतविरोधी विभागात (एटीएस) कार्यरत नीलेश मोहिते (४६) यांच्या बॉडीगार्ड पोलीस वसाहतीतील घरामध्ये घुसून एका लुटारूने तब्बल साडेतेरा तोळ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि सर्विस रिव्हॉल्व्हरसह ३० जिवंत काडतुसे चोरी केले. भायखळा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :RobberyचोरीHomeघरPoliceपोलिसEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखा