शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ४५ वर्षीय महिलेविरोधात पॉक्सोचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2019 14:15 IST

पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. मात्र, पुराव्यांसाठी त्याच्या वैद्यकीय तपासणीबाबत निर्णय घेतला जाईल असे देखील अणावकर यांनी सांगितले. 

ठळक मुद्देशेजारी राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने त्याला आपल्या घरी बोलावले आणि त्याचा लैंगिक छळ केला. १२ वर्षीय पीडित मुलगा वडिलांसोबत खार येथे राहतो तर इतर दोन भावंडं वांद्रे येथे आईसोबत  राहतात.

मुंबई - वांद्रे परिसरात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका १२ वर्षीय मुलाचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी ४५ वर्षीय महिलेला वांद्रे पोलिसांनी अटक करण्यात केली आहे. शनिवारी रात्री याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. रविवारी आरोपी महिलेला वांद्रे पोलिसांनीअटक केली. न्यायालयाने तिला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलीस कोठडी संपत असून पुन्हा न्यायालयात तिला हजर केले जाईल अशी माहिती वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश अणावकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. पीडित मुलगा अल्पवयीन असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली नाही. मात्र, पुराव्यांसाठी त्याच्या वैद्यकीय तपासणीबाबत निर्णय घेतला जाईल असे देखील अणावकर यांनी सांगितले. 

या घटनेबाबत अणावकर यांनी सांगितले की, पीडित मुलाला दोन लहान भावंडं आहेत. त्याच्या आई - वडिलांचा घटस्फोट झालेला आहे. १२ वर्षीय पीडित मुलगा वडिलांसोबत खार येथे राहतो तर इतर दोन भावंडं वांद्रे येथे आईसोबत  राहतात. आई - वडिलांचा घटस्फोट झालेला असला तरी भावंडांत दरी निर्माण न होऊ देण्याचं पालकांनी ठरवलं होतं. त्याप्रमाणे पीडित मुलगा आपल्या लहान भावंडांना भेटायला वांद्रे येथील आईच्या घरी येत जात असे. दरम्यान, शेजारी राहणाऱ्या महिलेला मुलगा ओळखत होता.शनिवारी पीडित मुलगा आईकडे वांद्रे येथे आला असताना शेजारी राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेने त्याला आपल्या घरी बोलावले आणि त्याचा लैंगिक छळ केला. मुलाचे वडिल जेव्हा त्याला घरी घेऊन जाण्यासाठी आले त्यावेळी त्यांना मुलगा निराश दिसला. त्यांनी मुलाला निराशेचे कारण विचारले तेव्हा तो काही बोलला नाही. विश्वासात घेऊन विचारल्यानंतर मुलाने सर्व घडलेला प्रकार सांगितले. महिलेने तिच्या घरात असताना आपला लैंगिक छळ केला व याबद्दल कुठे बोलू नकोस असे बजावल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. आम्ही मुलाचा जबाब नोंदवला आहे. पॉक्सो कायद्यातंर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती अणावकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

 

टॅग्स :POCSO Actपॉक्सो कायदाMolestationविनयभंगsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक