शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! गावकऱ्याच्या छळामुळे पोलीस पाटील महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, आपबितीचा व्हिडीओ व्हायरल

By सुमेध उघडे | Updated: December 10, 2020 18:31 IST

पोलीस पाटील यांचा आपबिती कथन करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

ठळक मुद्देगावातील वाघ कुटुंबाकडून छळ होत असल्याने उचले टोकाचे पाऊलपोलीस आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले नसल्याचा व्हिडीओ

औरंगाबाद : गावातील वाघ कुटुंबाकडून माझा आणि माझ्या कुटुंबाचा तीन वर्षांपासून छळ सुरु आहे. या प्रकाराला पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ सुद्धा पाठीशी घालत आहेत असा आरोप करत पोलीस पाटील महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सिल्लोड तालुक्यात उघडकीस आला आहे. निर्मला बाळासाहेब हिवरे असे पोलीस पाटील महिलेचे नाव असून त्यांनी आत्महत्येचा पर्यंत करण्यापुर्विचा  व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, निर्मला बाळासाहेब हिवरे या सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील रहिवासी आहेत. त्या गावच्या पोलीस पाटील आहेत. गावातील रामदास वाघ त्याची आई मीरा आणि बहिण सुनिता हे निर्मला यांना तीन वर्षांपासून सतत त्रास देत आहेत. वाघ कुटुंब जाणीवपूर्वक शारीरिक, आर्थिक आणि मानसिक छळ करतात. रामदास वाघ पती घरी नसताना घरासमोर येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करतो. या प्रकाराला गाव सुद्धा पाठीशी घालत आहे. तसेच पोलिसांकडे रामदास वाघ यांनी खोट्या तक्रारी केल्या आहेत. पोलीस सुद्धा आमच्यावरील अन्यायाची दखल घेत नाहीत. या त्रास असहाय्य झाल्याने आत्महत्या करत आहे. याला गाव आणि पोलीस प्रशासन जबाबदार आहे. माझ्यानंतर कुटुंबाला न्याय द्या, असा व्हिडीओ निर्मला हिवरे यांनी केला आहे. यानंतर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांच्यावर सिल्लोड येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत अद्याप गुन्हा दाखल झालेला नसून निर्मला यांचा आपबिती कथन करणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पोलिसात तक्रार केली नव्हती  निर्मला हिवरे यांनी झालेल्या प्रकारची पोलिसात तक्रार केली नव्हती अशी माहिती सिल्लोड पोलिसांनी दिली आहे. व्हायरल व्हिडीओची दखल घेऊन पोलीस पुढील कारवाई करणार आहेत. दरम्यान, वडिलांच्या मृत्यूस हिवरे कुटुंब जबाबदार असल्याचा वाघ कुटुंबियांचा आरोप आहे. पोलीस तपासात यात काही निष्पन्न झाले नव्हते. मात्र, वाघ कुटुंब तेव्हापासून हिवरे यांना त्रास देत असल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस