मुंबई - साकीनाका येथील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात बुधवारी रात्री एका पोलीस कॉन्स्टेबलने सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुधीर गुरव असं या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पवई पोलीस ठाण्यात हा कॉन्स्टेबल नोकरी करत होते. या घटनेनंतर पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून कॉन्स्टेबलच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.साकीनाका येथील सहय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात रायटर म्हणून सुधीर गुरव (४६) हे कार्यरत होते. बुधवारी रात्री कार्यालयातील त्यांचे इतर सहकारी निघून गेल्यानंतर गुरव उशिरापर्यंत थांबले होते. सर्व सहकारी गेल्यानंतर गुरव यांनी ९. ३० वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस आयुक्तांचे चालक त्यांना घरी सोडून वाहन ठेवण्यासाठी कार्यालयात आले असता त्यांना गुरव यांची बॅग दिसली. त्यांनी गुरव यांना फोन केला असता गुरव फोन उचलत नव्हते. कार्यालयात आत शोधा शोध केल्यानंतर त्यांना गुरव लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. गुरव हे पत्नी आणि मुलीसह विक्रोळी पोलीस कॉलनीत राहत होते. घटनास्थळी कोणतीही सुसाईट नोट न सापडल्याने गुरव यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. मात्र, नुकतीच गुरव यांची बायपास सर्जरी झाली होती. तर त्यांच्या भावाचे ही कॅन्सरच्या आजाराने निधन झाले होते. त्यामुळे गुरव हे नैरश्येत होते. यातूनच त्यांनी हे पाऊल उचलले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबलने गळफास लावून केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 20:23 IST
कॉन्स्टेबलच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेलं नाही.
धक्कादायक! पोलीस कॉन्स्टेबलने गळफास लावून केली आत्महत्या
ठळक मुद्देसुधीर गुरव असं या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सर्व सहकारी गेल्यानंतर गुरव यांनी ९. ३० वाजताच्या सुमारास आत्महत्या केली. गुरव हे पत्नी आणि मुलीसह विक्रोळी पोलीस कॉलनीत राहत होते.