Shocking! Police brutally beaten; Trio arrested in mumbra | धक्कादायक! पोलिसाला बेदम मारहाण; त्रिकुटाला अटक 
धक्कादायक! पोलिसाला बेदम मारहाण; त्रिकुटाला अटक 

ठळक मुद्दे मुंब्र्यातील विविध ठिकाणी  करण्यात आलेल्या या कारवाईत 250 दुचाकी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या कारवाई  मुळे नाराज झालेल्या काही तरुणांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर पोलिस शिपाई  अगथ मुंडे याच्याशी वादावादी घालण्यास सुरवात केली.

मुंब्रा - बेकायदेशीररित्या वाहन चालविणाऱ्या वाहनचालकाविरोधात कारवाईचा बडगा उगारताच संतप्त झालेल्या वाहनचालकांनी वाहतूक शाखेच्या पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना मुंब्र्यात घडली. मारहाण केलेल्या चौघांपैकी तिघांना पोलिसांनी अटक केली. ठाणे वाहतूक शाखेच्या अंतर्गत येणाऱ्या मुंब्रा उपवाहतूक शाखेतील पोलिसांनी अनुज्ञाप्ती (लायसन्स) नसलेल्या तसेच ट्रीपल सीट आणी कमी वयात दुचाकी चालवून जीव धोक्यात घालणाऱ्या दुचाकी चालकांवर धडक कारवाई केली. मुंब्र्यातील विविध ठिकाणी  करण्यात आलेल्या या कारवाईत 250 दुचाकी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतल्या. या कारवाई  मुळे नाराज झालेल्या काही तरुणांनी वाहतूक शाखेच्या कार्यालयासमोर पोलिस शिपाई  अगथ मुंडे याच्याशी वादावादी घालण्यास सुरवात केली. वादावादीचे पर्यावसन हाणामारीत होऊन चौघांनी मुंडे याचा शर्ट पकडून त्याना मारहाण केली. मारहाण केलेल्या अशपाक कुरेशी, फैजान शेख आणि शमशुउद्दीन बनगी या तीघांना पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याच्या गुन्ह्याअंतर्गत अटक केली असून पसार झालेल्या तमशिल कुरेशी याचा पोलीस शोध घेत असल्यची माहिती मुंब्रा वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक सुरेश लंभाते यांनी लोकमतला दिली.


Web Title: Shocking! Police brutally beaten; Trio arrested in mumbra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.