Shocking! Patient had suicide due to illness | धक्कादायक! आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या

धक्कादायक! आजारपणाला कंटाळून रुग्णाची आत्महत्या

ठळक मुद्देज्ञानेश्वर कांबळे (४१) असे मृत्यू रुग्णाचे  नाव आहे. कामोठे एमजीएममधील या घटनेने परिसरात चांगलीच तारंबळ उडाली होती.

पनवेल - कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास एका रुग्णाने सहाव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. 

ज्ञानेश्वर कांबळे (४१) असे मृत्यू रुग्णाचे नाव आहे. मागील काही  दिवसांपासून ज्ञानेश्वर यांच्यावर एमजीएम रुग्णालयात क्षयरोगावर  उपचार सूरु होते. मात्र अनेक दिवसापासूनच्या त्रासापासून कायमची मुक्तता व्हावी या हेतूने ज्ञानेश्वरीने आत्महत्येचा मार्ग अवलंबल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत. स्वच्छतागृहात जाऊन ज्ञानेश्वरने सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. मंगळवारी पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यांनतर ज्ञानेश्वरचा मृतदेह कुटुंबियांना सुपूर्द करण्यात येणार आहे. कामोठे एमजीएममधील या घटनेने परिसरात चांगलीच तारंबळ उडाली होती.

Web Title: Shocking! Patient had suicide due to illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.