शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक... पनवेल - अंधेरी लोकलमध्ये तरुणीसमोर युवकाने केले अश्लील चाळे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 20:11 IST

२४ वर्षीय ट्रेकिंगला गेलेली तरुणी घरी परतत असताना घडली घटना 

पनवेल - लोकलमध्ये महिलांच्या डब्ब्यात घुसलेल्या विकृत तरुणाने तरुणीसमोर हस्तमैथुन केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी रात्री पनवेल-अंधेरी मार्गावरच्या लोकल ट्रेनमध्ये हा प्रकार घडला. या घटनेमुळे लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २४ वर्षीय तरुणी पनवेल येथे ट्रेकिंगसाठी गेली होती. ट्रेकिंग झाल्यानंतर तिने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पनवेल स्थानकातून अंधेरी येथे जाणारी लोकल पकडली. त्यावेळी हा महिलांच्या डब्ब्यात चढलेल्या तरुणाने तिच्यासमोर अश्लील चाळे केले. याप्रकरणी पनवेल पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा तरुणीने दाखल केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.  

रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महिला डब्ब्यामध्ये ही तरुणी एकटीच होती. ट्रेन सुरु झाल्यानंतर धावत एका युवकाने ही ट्रेन पकडली. सुरुवातीला तिला वाटले कि, प्रचंड घाईमध्ये असल्यामुळे तो चुकून महिला डब्ब्यामध्ये आला असावा. मात्र, काही वेळाने या युवकाने त्याच्या पँटची चैन खोलून तिच्यासमोर हस्तमैथुन करून तिला लज्जा उत्पन्न केली. जेव्हा तिने आरडाओरडा केला तेव्हा त्याने अश्लील चाळे  करण्यात सुरुवात केली. जेव्हा तिने त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने तिच्यावर झडप घालून तिचा मोबाइल हिसकावून घेतला. तिने त्याचा प्रतिकार केला. लोकल खांडेश्वर स्थानकाजवळ येताच तिने प्लॅटफॉर्मवरच्या लोकांना सर्तक करण्यासाठी मदतीसाठी आरडाओरडा सुरु केला. पण तोपर्यंत आरोपीने डब्ब्यातून बाहेर उडी मारली होती. पळताना त्याने तिचा मोबाइल पुन्हा डब्ब्यात फेकून दिला.

पनवेल पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला  रेल्वे पोलिसांनी अशाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी याआधी अटक केली होती का? त्याची पनवेल रेल्वे पोलीस खातरजमा करत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आरोपी ट्रेन पकडताना दिसलेला नाही.  पण खांडेश्वर स्थानकात उतरताना तो फुटेजमध्ये दिसत आहे. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटवणे थोडे कठिण जात आहे. रेल्वे पोलीस याबाबत सखोल तपास करत आहेत. कारण याआधी देखील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे बाहेरगावी जाणाऱ्या ट्रेन पकडणाऱ्या एका तरुणीसोबत देखील असाच विकृत प्रकार घडला होता. 

टॅग्स :Crimeगुन्हाNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबईAndheriअंधेरीMolestationविनयभंग