शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 5 वर्षांच्या मुलाला पित्यानेच पंचगंगा नदीत फेकले; आजारावर होणाऱ्या खर्चाला कंटाळून कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 10:30 IST

सिकंदर हा काही दिवस घराबाहेर होता त्याला पत्नी व मेहुणा यांनी शोधून दोन दिवसांपूर्वी घरी आणले. परतल्यानंतर मुलाच्या औषधोपचारावरून त्याला खडे बोल सुनावले. त्यामुळे तो रागात होता.

अतुल आंबी -इचलकरंजी - कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका निर्दयी पित्याने औषधोपचाराचा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून पोटच्या पाच वर्षीय मुलाला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार, त्याने स्वतःच पोलिसांसमोर कबुली दिल्याने उघडकीस आला. अफांन सिकंदर मुल्ला ( वय 5 रा. पंचगंगा साखर कारखाना रोड कबनूर) असे संबंधित मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पिता सिकंदर हुसेन मुल्ला (वय 48) याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. गेल्या दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. या घटनेमुळे पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

यासंदर्भात, पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेली माहितीनुसार, सिकंदर मुल्ला हा अपंग असून मिळेल तेथे मजुरीचे काम करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे तो अनेक वेळा घराबाहेरच असतो. त्याला दहा वर्षाची मुलगी व अफान अशी  दोन मुले आहेत. गेल्या काही महिन्यापासून त्यांच्यात कौटुंबिक वाद आहे. अफान याला फिट्सचा आजार असल्याने औषधोपचाराचा खर्च त्याला झेपत नाही. या कारणावरूनही त्यांच्यात सतत वाद होत होता. सिकंदर हा काही दिवस घराबाहेर होता त्याला पत्नी व मेहुणा यांनी शोधून दोन दिवसांपूर्वी घरी आणले. परतल्यानंतर मुलाच्या औषधोपचारावरून त्याला खडे बोल सुनावले. त्यामुळे तो रागात होता.

दरम्यान काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उपचारासाठी जावूया, असे सांगून तो सायकलवरून अफानला घेऊन घराबाहेर पडला. रात्री घरी आल्यानंतर त्याने मुलाला पंचगंगा नदीत फेकल्याचे नातेवाईकांना सांगितले. परंतु त्याच्या बोलण्यावर नातेवाईकांनी विश्वास ठेवला नाही. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊनही अफान सापडत नसल्याने नातेवाईक व नागरिकांनी त्याला शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कसून चौकशी करता त्याने अफानला पंचगंगा नदीवरील मोठ्या पुलावरून फेकून दिल्याचे सांगितले. त्यामुळे रात्री उशिरा पोलिसांनी अफान याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु अंधारामुळे शोध थांबवून शुक्रवारी सकाळपासून पुन्हा त्याचा शोध सुरू केला आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी