Shocking! murder of tution teacher; Police suspect over student | धक्कादायक! खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेची हत्या; विद्यार्थ्यावर पोलिसांचा संशय  
धक्कादायक! खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेची हत्या; विद्यार्थ्यावर पोलिसांचा संशय  

ठळक मुद्दे काल सोमवारी रात्री नऊ वाजता विद्यार्थ्याने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर आयेशा गेल्या दोन वर्षापासून एकट्याच राहत होत्या.

मुंबई - शिवाजीनगर परिसरात खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकेची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात एकाच खळबळ माजली आहे. आयेशा हुशी (३२) असं मृत शिक्षिकेचं नाव आहे. पोलिसांनी तपासासाठी सहावीच्या विद्यार्थी ताब्यात घेतले आहे. काल सोमवारी रात्री नऊ वाजता विद्यार्थ्याने तिची हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाणे अधिक तपास करत आहेत.

पतीसोबत घटस्फोट झाल्यानंतर आयेशा गेल्या दोन वर्षापासून एकट्याच राहत होत्या. त्यांना दोन मुले असून ती पतीसोबत राहतात. आयेशा खाजगी शिकवणी घेऊन उदरनिर्वाह करत होत्या. सोमवारी खाजगी शिकवणी संपल्यानंतर विद्यार्थी घरी निघून गेले. मात्र, थोड्याच वेळाने पोलिसांनी ताब्यात घेतलेला विद्यार्थी हातात चाकू घेऊन पुन्हा शिक्षिकेच्या घरी आला आणि घरातून बाहेर पडताना त्याच्या हातामध्ये चाकू असल्याचे काही नागरिकांनी पाहिले. त्यामुळे त्याने हत्या केल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र, यामागे आणखी कोणीतरी असल्याच्या शक्यतेतून पोलीस तपास करत आहेत. सोमवारी रात्री सात ते आठ वाजताच्या दरम्यान हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


Web Title: Shocking! murder of tution teacher; Police suspect over student
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.