भयानक! मुंबईच्या डॉक्टरचा तरुणीवर वारंवार बलात्कार; त्यानंतर केला धक्कादायक प्रकार

By मुकेश चव्हाण | Updated: October 30, 2020 15:53 IST2020-10-30T15:53:10+5:302020-10-30T15:53:33+5:30

एका अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 30 वर्षीय तरुणीने डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Shocking! Mumbai doctor repeatedly rapes young woman | भयानक! मुंबईच्या डॉक्टरचा तरुणीवर वारंवार बलात्कार; त्यानंतर केला धक्कादायक प्रकार

भयानक! मुंबईच्या डॉक्टरचा तरुणीवर वारंवार बलात्कार; त्यानंतर केला धक्कादायक प्रकार

मुंबई: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.  मात्र एकीकडे देश कोरोनासारख्या महामारीचा एकजूटीने सामना करत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

राज्यातील पालघर जिल्ह्यातील पोलिसांनीमुंबईतील एका डॉक्टरांवर आपल्या सहकारीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने महिलेला लग्नाचं खोटं वचन देत जुलै 2018 आणि सप्टेंबर 2020 दरम्यान वारंवार बलात्कार केला. त्यानंतर पीडित तरुणी गर्भवती झाली. मात्र आरोपीने पीडित तरुणीला तिच्या इच्छेविरुद्ध तिला गर्भपात करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. 

एका अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, 30 वर्षीय तरुणीने डहाणू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये पीडित तरुणीने  तक्रारीत लग्नाचं वचन देत माझ्यावर मुंबईच्या डॉक्टरने वारंवार बलात्कार केला असल्याचं म्हटलं आहे. तसेच मला गर्भपात करण्यास सांगत आहे. त्याचप्रमाणे मी गर्भपात न केल्यास माझे आपत्तीजनक व्हिडीओ सार्वजनिक करेल अशी धमकीही मला देत आहे, अशी माहिती पीडित तरुणीने दिली आहे. 

 तक्रारीवर तपास सुरू करण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असं संबंधित पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. आयपीएसच्या विविध कलमांअतर्हत आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: Shocking! Mumbai doctor repeatedly rapes young woman