शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! पतीच्या विवाहबाह्य संबधामुळे चिमुकल्या मुलाची हत्या करून आईने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2019 14:57 IST

अनुजा वंजारी (३०) असं या महिलेचं नाव असून नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आलं आहे. याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ठळक मुद्देदिपकवर संतापलेल्या अनुजाने आपल्या ३ वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ला देखील संपवून घेतले. एका लग्नसमारंभात अनुजाचे दीपकसोबत भांडण झाले होते.  कुर्ला येथील बैल बाजार परिसरातील गुरुदत्त सोसायटीत अनुजा तिच्या कुटुंबासोबत राहायची.  संध्याकाळी कामावरुन परतलेल्या अनुजाच्या सासूने अनुजा बराचवेळ दार उघडत नसल्याचं शेजाऱ्यांना सांगितलं.

मुंबई - कुर्ला परिसरात एका महिलेने मुलाची हत्या करुन नंतर स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनुजा वंजारी (३०) असं या महिलेचं नाव असून नवऱ्याच्या विवाहबाह्य संबंधामुळे नवऱ्यासोबत भांडण झाल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आलं आहे. याबाबत विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिपकवर संतापलेल्या अनुजाने आपल्या ३ वर्षांच्या मुलाची हत्या केली आणि त्यानंतर स्वत:ला देखील संपवून घेतले. एका लग्नसमारंभात अनुजाचे दीपकसोबत भांडण झाले होते. त्यामुळे रागाच्या भरात तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं. कुर्ला येथील बैल बाजार परिसरातील गुरुदत्त सोसायटीत अनुजा तिच्या कुटुंबासोबत राहायची. मंगळवारी रोजच्या दिनक्रमानुसार अनुजाचा सासू आणि नवरा कामासाठी घराबाहेर पडले. मनात नवऱ्याविरुद्धचा भांडणामुळे निर्माण झालेला राग असल्याने अनुजाने ओढणीने आपल्या मुलाचा गळा घोटून आपल्या ३ वर्षीय मुलाची हत्या केली. त्यानंतर तिने स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. संध्याकाळी कामावरुन परतलेल्या अनुजाच्या सासूने अनुजा बराचवेळ दार उघडत नसल्याचं शेजाऱ्यांना सांगितलं. त्यानंतर शेजारील एक तरुण घराच्या खिडकीमधून आत घुसला. त्यावेळी घरात नेमकं काय झालंय याचा उलगडा झाला. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा आणि अपमृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती सहाय्य्क पोलीस आयुक्त उत्तम कोलेकर यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :Suicideआत्महत्याMurderखूनCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस