शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भरदिवसा घरात घुसून गरोदर महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 19:23 IST

याबाबत पोलीस या गुन्ह्याचा सविस्तर तपास करत असून त्याची सत्यता तपासून कारवाई केली जाईल असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

ठळक मुद्देमहिला घरात एकटीच असल्याचं पाहून दोन अज्ञातांनी घरात घुसून त्यांचा विनयभंग करत फोटो काढले. पीडित महिला ही पाच महिन्यांची गरोदर असून पोलीस भरतीचे क्लास घेते.

वसई - हिंगणघाट मागोमाग लासलगाव येथील घटना ताजी असतानाच वसईमध्ये भरदिवसा राहत्या घरातच एका महिलेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिला घरात एकटीच असल्याचं पाहून दोन अज्ञातांनी घरात घुसून त्यांचा विनयभंग करत फोटो काढले. दुपारी पावणेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी माणिकपूर पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून, शोधमोहीम सुरू केली आहे. याबाबत पोलीस या गुन्ह्याचा सविस्तर तपास करत असून त्याची सत्यता तपासून कारवाई केली जाईल असे माणिकपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

पीडित महिला ही पाच महिन्यांची गरोदर असून पोलीस भरतीचे क्लास घेते. घटना घडली त्यावेळी पीडित महिलेच्या घरात कुणीही नव्हते. पीडित महिलेचे कपडे काढलेल्या अवस्थेतले फोटोही आरोपींनी काढले. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. रविवार असल्याने क्लासला सुट्टी होती. पती कामावर गेले होते. त्यामुळे त्या एकट्याच घरी होत्या. त्यावेळी दुपारी पावणेबाराच्या दरम्यान घराची बेल वाजली. दरवाजा उघडल्यानंतर दोन अनोळखी इसमांनी पती कुठे आहे असे विचारले. त्यावर ते कामावर गेल्याचे महिलेने सांगितले. त्यांनतर आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे सांगून दोघे बळजबरीने घरात घुसले. पीडितेला धक्का देऊन तिचा विनयभंग केला. यावेळी तिला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करुन तिचे फोटोही काढले. घटनेनंतर पीडित महिलेने तत्काळ माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी दोन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :MolestationविनयभंगVasai Virarवसई विरारPoliceपोलिसpregnant womanगर्भवती महिला