शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; ट्रेनमधून उतरायला विसरली... आणि पुढे रिक्षा-स्कुटीवाल्यांनी केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 16:53 IST

घडलेला प्रसंग तिने घरी सांगितल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

ठळक मुद्देतिन्ही आरोपींची उद्या पोलीस कोठडी संपत असल्याने कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी माहिती दिली.रिक्षाचालकाने मदत करण्याच्या बहाण्याने एमआयडीसीच्या निर्जनस्थळी नेऊन महिलेवर बलात्कार केला.

नवी मुंबई - एमआयडीसीच्या निर्मनुष्य परिसरात 19 फेब्रुवारीच्या रात्री एका वाट चुकलेल्या महिलेवर ८.३० ते १२ वाजण्याच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी दोन वेळा बलात्कार  झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एका रिक्षाचालकासह स्कुटीवरील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित १९ वर्षीय नवविवाहित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून तिन्ही आरोपींची उद्या पोलीस कोठडी संपत असल्याने कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी माहिती दिली.१९ फेब्रुवारीला नाशिकहून मुंबईत आलेल्या पीडित महिलेची आपल्या नवऱ्यासोबत रेल्वे प्रवासात ताटातुट झाली होती. महिलेकडे मोबाईल देखील नव्हता. महिलेचा नवऱ्याने कुर्ला रेल्वे पोलिसांना याबाबत माहित दिली. नंतर महिला मुंब्रा स्थानकात उतरली. तिथे तिला एका भीक मागत असलेल्या महिलेने त्या महिलेकडे पैसे नसल्याने महापे येथे दागिने विकून पैसे देतो असं सांगून नेले. दरम्यान महापे येथे पोचल्यानंतर भीक मागणारी महिला स्वतःच्या घरी गेली. दागिने विकण्याचं काम झालंच नाही उलटपक्षी महिलेला एका रिक्षाचालकाने मदत करण्याच्या बहाण्याने एमआयडीसीच्या निर्जनस्थळी नेऊन महिलेवर बलात्कार केला. त्यानंतर स्कुटीवरून जाणाऱ्या दोघांकडे तिने मदत मागितली असता त्यांनी देखील घणसोली हायवेनजीक असलेल्या झाडीत नेऊन बलात्कार केला. कशीबशी पीडित महिला घणसोली रेल्वे स्टेशनला पोचली. प्रवाशांच्या मदतीने ती आपल्या घरी नाशिक पोचली. त्यानंतर घडलेला प्रसंग तिने घरी सांगितल्यानंतर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

भिवंडीत गुंगीचे औषध देऊन तरुणीवर डॉक्टरचा बलात्कार

 

भाजप आमदारासह ७ जणांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा

महिलेच्या अंगावर जास्त दागिने नव्हते. केवळ ती रात्रीच्या वेळी नराधमांना वासनांच्या बळी पडली. पीडित महिलेच्या कानात सोन्याचे कानातले, पायात चांदीचे पैंजण, कानात सोन्याची चमकी होते. ते स्कुटीवरील नराधमांनी काढून घेतले होते. ते त्यांनी घरीच ठेवले होते. पोलिसांनी ते हस्तगत केले असल्याची माहिती गीते यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :Rapeबलात्कारNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिसArrestअटकNashikनाशिक