शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मॅडमनेच विद्यार्थिनीला पाठविले नवऱ्याच्या बेडरूममध्ये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 09:54 IST

प्राध्यापक पती-पत्नीकडून लैंगिक छळ

लोकमत न्यूज नेटवर्क  छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकासह त्याच्या पत्नीच्या विरोधात विद्यार्थिनीच्या लैंगिक छळाचा गुन्हा बेगमपुरा पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री नोंदविला. आरोपींमध्ये डॉ. अशोक गुराप्पा बंडगर व त्याची पत्नी पल्लवी अशोक बंडगर (रा. विद्युत कॉलनी) यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

विद्यापीठातील एका विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीनुसार, शासकीय कला महाविद्यालयात २०१९ ते २०२१ मध्ये शिक्षण घेताना तृतीय सत्रात सर्व्हिस कोर्ससाठी एका विषयाची निवड केली होती. त्या विषयाची शिकवणी डॉ. बंडगर हा ऑनलाइन घेत होता. तेव्हा पीडितेची त्याच्यासोबत ओळख झाली. त्याने चौथ्या सत्रात लघुप्रबंध सादर करण्यासाठी नोव्हेंबर २०२१ मध्ये पीडितेला मार्गदर्शन केले. पीडितेचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बंडगरने विद्यापीठातील एका विभागात तिला प्रवेश मिळवून दिला. त्याचवेळी चित्रपटात काम देण्याचेही आमिष दाखवले. पीडितेला वसतिगृहाऐवजी स्वत:च्या घरीच पेइंग गेस्ट म्हणून राहण्यास घेऊन गेला. जून २०२२ मध्ये बंडगरने अनेक वेळा छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. जुलै २०२२ मध्ये पहाटे हॉलमध्ये पीडिता झोपली असताना बंडगरने  तिच्यावर  बलात्कार केला. त्यानंतर पाच ते सहा वेळा संंबंध ठेवले. जानेवारी २०२३ मध्ये हा सर्व प्रकार बंडगरच्या पत्नीस पीडितेने सांगितला हाेता.

विद्यापीठाचे पोलिसांत जाण्यासाठी लेखी पत्र एकदा अत्याचाराच्या वेळी पीडिता बेशुद्ध पडली. तिची प्रकृती बिघडल्यामुळे ती गावी गेली. तिला परत येण्यासाठी दाम्पत्याने दबाव टाकला, पण पीडितेने नकार देऊन अखेर सर्व घटनाक्रम वडिलांसह बहिणीला सांगितला. वडिलांनी याविषयी विद्यापीठाकडे तक्रार करण्यास सांगितले. विद्यापीठाने प्राथमिक चौकशी करीत पीडितेला पोलिसांत जाण्याविषयी लेखी पत्र दिले. त्यानंतर पीडितेने बेगमपुरा ठाण्यात तक्रार नोंदवली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिस