जळगाव - ‘मी आता जिवंत रहात नाही’ असे सांगण्यासाठी पत्नीला व्हिडीओ कॉल करुन निखिल पंकज शहा (३३, मूळ रा. डहाणू, जि. पालघर) या तरुणाने आपले जीवन संपविल्याची घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. यानंतर घरी परतलेल्या पत्नीला निखिल मृतावस्थेत आढळून आला. निखील याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट झालेले नाही. निखिल एका मोबाईल कंपनीत डिस्ट्रिब्युटर होता. तर पत्नी खुशबू एमआयडीसीत एका ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरीला आहे. मंगळवारी पत्नी कामावर असताना निखिल हा एकटाच घरी होता. दुपारी बारा वाजता निखील याने पत्नीला व्हीडीओ कॉल केला व मी मृत्यूला कवटाळतो आहे असे सांगितले.
धक्कादायक! पत्नीला व्हिडीओ कॉल करत तरुणाने संपवले जीवन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 23:36 IST