धक्कादायक! लग्नास नकार दिलेल्या विवाहितेवर चाकूहल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 09:51 PM2019-11-26T21:51:28+5:302019-11-26T21:52:49+5:30

पुन्हा नकार मिळाल्याने तरुणाने चाकूने हल्ला करत विवाहितेला आणि तिच्या बहिणीला जखमी केले. 

Shocking! Knife attack on married women who refuses to marry | धक्कादायक! लग्नास नकार दिलेल्या विवाहितेवर चाकूहल्ला

धक्कादायक! लग्नास नकार दिलेल्या विवाहितेवर चाकूहल्ला

Next
ठळक मुद्दे ही धक्कादायक घटना बोरिवलीत शिंपोली परिसरात घडली आहे. आरोपीचे नाव अतुल कनोजिया असं आहे. मे महिन्यात नम्रताचे लग्न झाले.

मुंबई - लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याने विवाहितेवर चाकूने हल्ला करण्यात आला. ही धक्कादायक घटना बोरिवलीत शिंपोली परिसरात घडली आहे. आरोपी तरुणाने तीन वर्षांपुर्वी पीडित महिलेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी तरुणीने नकार दिला होता. तीन वर्षांनी पुन्हा एकदा आरोपी तरुणाने ती माहेरी आल्यानंतर  लग्नासाठी विचारणा केली. यावेळी पुन्हा नकार मिळाल्याने तरुणाने चाकूने हल्ला करत विवाहितेला आणि तिच्या बहिणीला जखमी केले. 

सोमवारी नम्रता एका लग्नासाठी मोहरी आली होती. जेवणानंतर घराबाहेर पडली असता आरोपी अतुल कोनाजिया याने तिचा पाठलाग केला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यावेळी त्याने पुन्हा एकदा नम्रतासमोर लग्नासाठी प्रस्ताव ठेवला. तिने पुन्हा नकार दिला असता अतुलने तिच्यावर चाकूने हल्ला केला. नम्रताची मोठी बहीण अंकिता बचावासाठी पुढे आली. त्यावेळी आरोपीने तिच्यावरही हल्ला करत जखमी केलं.यावेळी नम्रताचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. मात्र, आरोपीने पळ काढला. पोलिसांना पाचारण केले असता पोलिसांनी त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केलं. अंकिता जास्त जखमी नसल्याने तिला लगेच डिस्चार्ज देण्यात आला. पण नम्रताला गंभीर जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर काही तासात आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपीचे नाव अतुल कनोजिया असं आहे. त्याने तिच्या घरी लग्नाचा प्रस्ताव पाठवला होता. पण नम्रता आणि तिच्या कुटुंबीयांना लग्नासाठी नकार दिला होता. मे महिन्यात नम्रताचे लग्न झाले. यानंतर ती आपल्या पतीसोबत शिफ्ट झाली होती.

Web Title: Shocking! Knife attack on married women who refuses to marry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.