शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वरळीतील धक्कादायक घटना; दोन बसमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 21:52 IST

Accident Case : गौतम सिद्धार्थ भालेराव असं आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई - वरळी गाव बस आगारामध्ये दोन बेस्टच्या बसमध्ये चिरडून १७ वर्षीय मुलीचा मंगळवारी दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आगारामध्ये बस नेत असताना चढणावरून बस खाली उतरल्यामुळे ही मुलगी दोन बसच्यामध्ये चिरडली गेली आणि रक्तबंबाळ झाली. प्रीती कोरी असे मृत मुलीचे नाव आहे. याप्रकरणी एका बेस्टच्या बस चालकाला दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गौतम सिद्धार्थ भालेराव असं आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रीती कोरी ही मुलगी वरळी कोळीवाड्यातील रहिवासी असून मैत्रीणीसोबत ट्युशनला गेली होती. त्यावेळी तिची मैत्रीण मागे राहिली आणि मुलगी फोनवर बोलत पुढे आली होती. त्याचवेळी आगारामध्ये एक बेस्टची बस आत जात होती. तर दुसरी बस मागे उभी होती. अचानक पुढील बस चढणावरून मागेच्या बाजूने खाली उतरल्यामुळे दोन बसमध्ये ही मुलगी चिरडली गेली.

रक्तबंबाळ अवस्थेत जखमी मुलीला तात्काळ परळ येथील केईएम रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३०४(अ) आणि निष्काळजीपणे बस चालवल्याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहेत. बसचालक गौतम सिद्धार्थ भालेराव(३०) असे अटक करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. तो घाटकोपर येथील रहिवासी आहे.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक