शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सानपाड्यातील धक्कादायक घटना; माथेफिरूने दोघांवर केला जीवघेणा हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 14:43 IST

दोघांवर हल्ला केल्यानंतर माथेफिरूने स्वतःवर देखील वार करून घेतले.

ठळक मुद्देभांडण सोडवायला गेलेल्या दोघांवर माथेफिरूने ऑपरेशनच्या ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.एकाला 32 तर दुसऱ्याला 28 टाके पडले आहेत.

नवी मुंबई - रस्त्यावर चाललेले भांडण सोडवायला गेलेल्या दोघांवर माथेफिरूने ऑपरेशनच्या ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. यामध्ये एकाला 32 तर दुसऱ्याला 28 टाके पडले आहेत. तर दोघांवर हल्ला केल्यानंतर माथेफिरूने स्वतःवर देखील वार करून घेतले.सानपाडा सेक्टर 5 येथे रविवारी रात्री भररस्त्यात हा प्रकार घडला. त्याठिकाणी एक मुलगा व महिला रस्त्यात भांडण करत उभे होते. यामुळे जवळच राहणारी एक व्यक्ती त्यांचे भांडण सोडवायला गेले. या गोष्टीचा राग आल्याने महिलेसोबत असलेल्या त्या माथेफिरू तरुणाने स्वतःकडे असलेल्या ऑपरेशन करण्याच्या ब्लेडने वार केले. त्याच्या हल्ल्यातून स्वतःचा बचाव करण्यासाठी व्यक्तीने त्याचा हात पकडण्याचा देखील प्रयत्न केला. यावेळी त्यांच्यात सुरु असलेली झटापट पाहून त्या व्यक्तीच्या परिचयाच्या तरुणाने देखील मदतीला धाव घेतली. त्यामुळे सदर माथेफिरू तरुणाने त्याच्यावर देखील ब्लेडने वार केले. त्यामध्ये जखमी झालेल्या दोघांनी तिथून पळ काढला असता, सदर तरुण व महिलेने सोसायटीच्या गेट पर्यंत त्यांचा पाठलाग करून पुन्हा डोक्यावर व गळ्यावर वार करून तिथून पळ काढला. या घटनेत जखमी झालेल्या दोघांना स्थानिकांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचवेळी त्या माथेफिरूने स्वतःवर देखील वार करून घेऊन दोघांविरोधात तुर्भे पोलिसांकडे तक्रार केली. मात्र घटनास्थळी उपस्थित नागरिक व सीसीटीव्ही यामुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानुसार सदर तरुणाविरोधात सानपाडा पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा पांडे (28) असे त्याचे नाव असून तो चेंबूर चा राहणारा आहे. सानपाडा परिसरात तो व त्यासोबतची महिला अमली पदार्थ विक्रीचा धंदा चालवत असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. तर घटनेवेळी देखील तो नशेत होता. या नशेत त्याने पोलिसठाण्यात देखील आरडा ओरडा करून प्रत्येकाला धमकावत होता. त्याच्याकडून घडलेल्या या कृत्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. याप्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ