शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video : प्रभादेवीतील धक्कादायक घटना! तरुणीला लिफ्टमध्ये धमकावून महिला सुरक्षारक्षकांनी केस पकडून केली मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2021 18:49 IST

Young girl Beaten in Lift : या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात रजवंत राजपूत त्रिलोकसिंग (४१) व प्रियांका बासुतकर (२७) या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दादर पश्चिमेकडील प्रभादेवीतील ओमेगा लग्जोरियन इमारतीमध्ये एक धक्कादायक मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.  या सीसीटीव्ही फुटेजमुळे हा गुन्हा उघडकीस आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन महिला सुरक्षारक्षकांनी एका तरुणीला लिफ्टमध्ये रस्ता अडवून केस पकडून मारहाण केली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात भादंवि ३४१, ३२३, ५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कसबे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, घटना २८ सप्टेंबरला घडली तेव्हा आमच्या पोलिसाने अदखलपात्र गुन्हा दाखल केला. मात्र तक्रारदार महिलेचा लिफ्टमधून रस्ता अडवून तिला घरी जाण्यास दिले नाही आणि धमकावत मारहाण केल्याची गंभीरता पाहता १० नोव्हेंबरला आम्ही दखलपात्र (FIR) गुन्हा दाखल केला.  

दादर येथील  प्रभादेवीतील ओमेगा लग्जोरियन इमारतीच्या परिसरातील एका 32 वर्षीय तरुणीने सत्या यादव हा सुरक्षारक्षक वाईटनजरेने पाहतो म्हणून सोसायटीकडे तक्रार केली होती. तसेच वडील आणि काकांशी आर के शर्मा सिक्युरिटी सर्व्हिसचा सिक्युरिटी सत्या यादव याने उद्धट वर्तन केले.   तरुणीने तक्रार केल्याच्या रागातून दोन महिला सुरक्षारक्षकांनी सोसोयटीमध्ये तक्रार करणाऱ्या तरुणीला लिफ्टमध्ये गाठून तक्रार मागे घेण्यास धमकावले आणि मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात रजवंत राजपूत त्रिलोकसिंग (४१) व प्रियांका बासुतकर (२७) या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. २८ सप्टेंबरला सायंकाळी ६.४५ वाजता कामावरून घरी जात असताना लिफ्टमध्ये अडवून रजवंत आणि प्रियंका या दोघींना तरुणीला अडवले आणि पुन्हा सिक्युरिटीविरुद्ध तक्रार दिल्यास वाईट परिणाम होतील अशी धमकी देऊन घरी जाण्यापासून रोखले. शिवीगाळ करून केस ओढून हाताने आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसcctvसीसीटीव्हीDadar Stationदादर स्थानक