शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यातील धक्कादायक प्रकार, अवैध गर्भपात केंद्राचा भंडाफोड; 8 जणांविरुद्ध गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 11:06 IST

अवैध क्लिनीक चालवणारा डॉक्टर फरार असून, पोलिसांनी गर्भपातासाठी वापरणारे किट जप्त केले आहे.

विजय मुंडेजालना : येथील भोकरदन मार्गावरील डॉ.सतीश गवारे यांच्या राजूरेश्वर क्लिनिकवर आरोग्य विभागाच्या पथकाने शुक्रवारी धाड टाकून तेथे अवैधरित्या गर्भलिंगनिदान व गर्भपात होत असल्याचा भंडाफोड केला. याप्रकरणी आठ जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून कारवाईचा सुगावा लागल्याने डॉ. गवारे सोनोग्राफी मशिनसह फरार झाला आहे.

आरोग्य विभागाचे पथक राजुरेश्वर क्लिनिकमध्ये गेले असता एका महिलेला गर्भपाताच्या गोळ्या देऊन बसविल्याचे आढळून आले. केंद्रातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर डॉ. गवारे महिलांचे गर्भलिंग निदान करण्यासाठी १५ ते २० हजार रुपये तर गर्भपात करण्यासाठी १८ ते २० हजार रुपये घेत असल्याचे समोर आले. या प्रकरणात डॉ. अर्चना भोसले यांच्या तक्रारीवरून संदीप राजू भानुदास पवार, सुनीता सुभाष सासणे, कौशल्या नारायण मगरे, फरार असलेले डॉ. सतीश बाळासाहेब गवारे, एजंट संदीप गोरे, डाॅ. पूजा विनोद गवारे, रुग्ण घेऊन येणाऱ्या डॉ. प्रिती मोरे, औषधी पुरविणाऱ्या स्वाती गणेश पाटेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

किट साहित्य जप्त

डॉ. गवारे याच्या राजुरेश्वर क्लिनिकमध्ये चायनिज अल्ट्रासाऊंड मशीन आहे. अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करण्यासाठी नोंदणीकृत नसलेली ही मशीन डॉ. गवारे वापरत होता. गर्भपातासाठी असलेले तीन एमटीपी किट, एक वापरण्यात आलेली किट आढळून आली. तसेच डॉक्टरांचे रेफर बुक, रजिस्टर, एमटीपी किट, रोख रक्कम, रुग्णालयातील सलाईन आदी साहित्य जप्त करण्यात आले.

ती माता सुखरूपपथकाने अवैध गर्भपात केंद्रावर कारवाई केली तेव्हा तेथे एक महिला गर्भपाताच्या गोळ्या खाऊन बसली होती, तत्काळ त्या महिलेला जिल्हा महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे गेल्यानंतर दहा मिनिटांमध्ये त्या महिलेचा गर्भपात झाला.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdocterडॉक्टर