शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कल्याणमधील धक्कादायक घटना; आत्महत्येपूर्वी तरुणाने तयार केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2018 15:28 IST

मृतदेह कल्याण पत्री पूलानजीक रेल्वे मार्गावर मिळून आला. त्याचे शीर धडापासून वेगळं झालेल्या अवस्थेत होते. त्याचा मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन तो सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.

ठळक मुद्देरोहित परदेशी या तरुणाने आत्महत्येपूर्वी मोबाईल व्हिडीओ तयार केला मृतदेह कल्याण पत्री पूलानजीक रेल्वे मार्गावर मिळून आलारोहित हा नेतिवली टेकडी परिसरात राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे.

कल्याण - कल्याण पूर्व येथील नेतिवली टेकडी परिसरात राहणाऱ्या रोहित परदेशी या तरुणाने आत्महत्येपूर्वी मोबाईल व्हिडीओ तयार केला आहे. त्यानंतर त्याने रेल्वे रुळाखाली आत्महत्या केली आहे. ही घटना गुरुवार रात्रीची आहे. त्याचा मृतदेह कल्याण पत्री पूलानजीक रेल्वे मार्गावर मिळून आला. त्याचे शीर धडापासून वेगळं झालेल्या अवस्थेत होते. त्याचा मृतदेह रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेऊन तो सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. रोहित हा नेतिवली टेकडी परिसरात राहणारा असल्याची प्राथमिक माहिती आहे.

रोहितने आत्महत्येपूर्वी मोबाईलमध्ये स्वत:चा व्हिडीओ तयार केला आहे. मला माझ्या भावाशिवाय या जगात कोणी नाही. त्यामुळे माझी  मालमत्ता माझ्या भावाला द्यावी. माझ्या आत्महत्येविषयी कोणाला जबाबदार धरु नये. मी काढलेला हा व्हीडीओ पोलिसांच्या हाती लागता कामा नये. मी आज रात्र पूर्णपणो जागा राहणार आहे. उद्याचा सूर्य मी पाहणार नाही. माझं नाव रोहित परदेशी असे आहे. हे सगळे त्याने स्वत:च्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले आहे. आज सकाळी रोहितचा मृतदेह रेल्वे मार्गादरम्यान आढळून आला. त्याच्याकडील मोबाईल जप्त केला आहे. त्याच्या मोबाईलमध्ये हा व्हिडीओ मिळून आला आहे. 

रोहितने नेमकी कोणत्या कारणावरुन आत्महत्या केली. त्याचा कोणाशी कशाच्या कारणावरुन वाद होता?  त्याने  व्हिडीओत कोणाला जबाबदार धरलेले नाही. तर मग त्याने आत्महत्या का केली? त्याला असा कोणता मानसिक त्रस होता. त्याला जाणीवपूर्वक हा त्रास दिला जात होता का ? या विविध अंगाने पोलीस तपास करीत आाहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याrailwayरेल्वेkalyanकल्याण