शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील धक्कादायक घटना! तरुणीला ओढत प्लॅटफाॅर्मवर नेले; तरुणाने अंगावर पेट्रोल ओतले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 06:00 IST

तरुणीने आरडाओरडा करताच नागरिक जमताहेत पाहून तो पळून गेला. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली

मुंबई - प्रेमसंबंध कायम ठेवण्यास नकार दिल्याच्या रागात तरुणाने तिचा पाठलाग करून तिला मुलुंड रेल्वेस्थानकात नेत आत्मदहनाची धमकी दिली. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी मुलुंडमध्ये सेल्समन म्हणून कार्यरत आहे.  यापूर्वी घाटीपाडा परिसरात राहत असताना तिची पुरब मनोहर गोरे (२१) याच्याशी ओळख झाली होती. २०२४ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, वारंवार होणाऱ्या वादांमुळे डिसेंबर २०२५ पासून तरुणीने त्याच्याशी संपर्क तोडला होता. त्यामुळे तिच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर नेहमी पाठलाग करायचा.

बुधवारी ती कामासाठी घराबाहेर पडताच गोरे तिच्या शॉपबाहेर आला. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने नकार देताच  तिचा हात पकडून  २० ते २५  फूट अंतरावर असलेल्या मुलुंड रेल्वेस्थानकात नेले. तिचा मोबाइल तपासला. त्यानंतर त्याच्या खिशातून पेट्रोलने भरलेली बॉटल काढून स्वतःच्या अंगावर ओतून घेत, सोबत नाही राहिली तर स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिली. तरुणीने आरडाओरडा करताच नागरिक जमताहेत पाहून तो पळून गेला. अखेर तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Jilted lover threatens woman with self-immolation at station.

Web Summary : In Mumbai, a man harassed a woman who refused to continue their relationship. He followed her to Mulund station, threatened self-immolation with petrol. Police are investigating.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस